

Pune Crime: Youth Killed After Girlfriend Calls Him Home in Kothrud Love Affair Dispute
esakal
पुणे : प्रेमाच्या नात्यामुळे उद्भवलेल्या वादातून एका २३ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना पुण्याच्या कोथरूड परिसरात घडली. मृत युवकाचे नाव नागेश संजय जाधव असे असून, त्याच्या प्रेयसीच्या घरच्यांनी संगनमत करून त्याला लाकडी दांडके व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात प्रेयसीच्या दहा कुटुंबीयांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत तरुणाच्या नातेवाईकांनी आरोपींना तात्काळ अटक करण्याची जोरदार मागणी केली आहे.