
Shocking Incident at Kothrud Police Station in Pune :पुण्यातील कोथरूड पोलिस ठाण्यात तीन दलित मुलींना कथितरित्या मारहाण प्रकरणात आता नवीन अपडेट समोर आलं आहे. खरंतर या तिन्ही मुलींनी पोलिसांविरोधातच दाद मागत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. या मागणीसाठी पुणे पोलिस आयुक्तालयात रविवारी रात्री उशीरापर्यंत या तीन मुलींसह काही राजकीय नेते आणि सामाजिक कार्यकर्ते ठाण मांडून होते. परंतु कोथरूड पोलिसांविरोधात पुणे पोलिसांकडून कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता. यामुळे वातावरण अधिकच तापलेलं असताना आता या प्रकरणात नवीन मोठी अपडेट समोर आली आहे.
पोलिसांकडून याप्रकरणात हलगर्जीपणा किंवा बेकायदेशीर वर्तन झालंय का? याची चौकशी एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्याकडून करण्यात आली असून, आज हा अहवाल पुणे पोलीस आयुक्तांना सादर केला जाणार होता. दरम्यान, यामध्ये या प्रकरणात पोलिसांनी कोणतेही बेकायदेशीर कृत्य केलेले नसून कसल्याही प्रकारचा हलगर्जीपणा झाल्या नसल्याचा अहवाल समोर आला आहे.
तर मिसिंगच्या तक्रारीचा तपास पूर्णपणे कायदेशीर केला असल्याचा अहवाल एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून तयार करण्यात आला असल्याचीही माहिती समोर आली आहे. हा अहवाल पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे आज सादर केला जाणार आहे.
तसेच कोथरूड पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप केलेल्या मुलींचा ससून रूग्णालयातील अहवालातील माहितीही समोर आली आहे. अद्याप पोलिसांनी हा अहवाल सादर केला नसला तरी, त्यातील माहिती लीक झाली आहे. विशेष म्हणजे कथितरित्या कोथरूड पोलिस ठाण्यात तब्बल चार तास पोलिसांकडून छळ झाल्यानंतर पीडित मुलींनी स्वत: ससून रूग्णालयात जाऊन त्यांची तपासणी करून घेतली होती.
मात्र या अहवालात मुलींच्या अंगावर कोणत्याही ताज्या जखमांच्या खुणा नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे आता या प्रकरणाता पोलिसांना अहवालामुळे दिलासा मिळणार असल्याचे समोर येत आहे. तर मुलींनी कोथरूड पोलिसांवर केलेला मारहाणीचा आरोप कमकुवत होण्याची चिन्हं आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.