
Pune Latest News: रागाने बघितल्याच्या कारणावरून कोयत्याने केलेल्या हल्ल्यात दोघेजण गंभीर जखमी झाले. ही घटना बिबवेवाडीतील इंदिरानगर परिसरात सोमवारी (ता. ६) सायंकाळी घडली. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
गौरव राजेश मरकड (वय २४, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) आणि त्याचा मित्र पियुष पाचकुडवे (वय २२, रा. सुपर इंदिरानगर) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.