esakal | पुणे: केवायसी अपडेट पडलं महागात; दोन लाखांची फसवणूक
sakal

बोलून बातमी शोधा

kyc

पुणे: केवायसी अपडेट पडलं महागात; दोन लाखांची फसवणूक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे: केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने लिंक पाठवून बँकेच्या खात्यातील सव्वा दोन लाख रुपये काढून घेत फसवणूक केली. हा प्रकार बावधन येथे घडला. याप्रकरणी मनीष अवधेश आनंद (रा. बावधन, पुणे) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा: Pune : मंगळवारी लसीकरण केंद्रावर कोव्हीशील्डचे २५० डोस

अज्ञात आरोपीने फिर्यादी यांच्या वडिलांच्या मोबाईलवर केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने लिंक पाठविली. त्यानंतर दहा रुपयांचा रिचार्ज करण्यास भाग पाडले. त्यानंतर आरोपीने एका मोबाईल ऍपच्या मदतीने फिर्यादीच्या वडिलांच्या खात्यातील दोन लाख २५ हजार रुपये काढून घेत पैशांचा अपहार केला. याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

पिंपरीत घरात शिरून मारहाण

जुन्या भांडणाच्या कारणावरून तीन जणांनी घरात शिरून एका मुलाला बेदम मारहाण केली. ही भांडणे सोडविण्यासाठी मुलाची आई आली असता त्यांनाही आरोपींनी मारहाण केल्याची घटना पिंपरीतील निराधार नगर येथे घडली. याप्रकरणी महिलेने पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रोहित नाशे (वय २७), गणेश भुंगा कांबळे (वय २२), कुमार सुखदेव वीर (वय २५, सर्व रा. निराधार नगर, पिंपरी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पिंपरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

loading image
go to top