ऑटोमॅटिक सिग्नलमुळे पुणे-लोणावळा रेल्वे 'राइट टाइम' 

ऑटोमॅटिक सिग्नलमुळे पुणे-लोणावळा रेल्वे 'राइट टाइम' 

पिंपरी (पुणे) : पुणे ते लोणावळादरम्यान धावणाऱ्या रेल्वेगाड्या व लोकलच्या वेळेत सुधारणा झाली आहे. रेल्वे प्रशासनाने लोणावळा ते चिंचवडदरम्यान ऑटोमॅटिक सिग्नल यंत्रणा बसवण्याचे काम पूर्ण केल्याने हा बदल झाला. उर्वरित पिंपरी ते शिवाजीनगरदरम्यानचे काम सहा महिन्यांमध्ये पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर रेल्वेचा प्रवास अधिक जलद होणार आहे. 


पुणे ते लोणावळादरम्यान पूर्वी ऑटोमॅटिक सिग्नल यंत्रणा सुरू नव्हती. त्यामुळे एका स्थानकावरून गाडी पुढे गेल्यानंतर काही वेळाने दुसरी गाडी पुढे जात असे. ऑटोमॅटिक सिग्नलमुळे ही अडचण दूर झाली आहे. रेल्वे प्रशासनाने चिंचवड ते लोणावळादरम्यानच्या लोहमार्गावर प्रत्येक एक किलोमीटर अंतरावर ही नवी यंत्रणा कार्यान्वित केली. त्यामुळे एक्‍स्प्रेस, मालगाडी, लोकल यांना कोणत्याही सिग्नलला थांबावे लागत नसल्याने गाड्या 'राइट टाइम' धावत आहेत.

गेल्या काही वर्षांपासून पुणे ते लोणावळादरम्यान रेल्वे वाहतुकीचा भार वाढल्याने लोहमार्गावरील ताणदेखील वाढला आहे. नवीन यंत्रणेमुळे हा ताण कमी होईल; तसेच प्रवाशांच्या वेळेत बचत होणार आहे. लोणावळा ते चिंचवडदरम्यानचे काम पूर्ण झाल्यामुळे या मार्गावर गाड्या वेळेत येत आहेत. मात्र, उर्वरित काम प्रशासनाने लवकर पूर्ण केल्यास प्रवाशांना त्याचा फायदा होणार असल्याचे दिनेश भोसले या प्रवाशाने सांगितले. 


यंत्रणेबाबत...
* ऑटोमॅटिक सिग्नल यंत्रणा बसविण्यास 2018 मध्ये सुरवात 
* लोणावळा ते चिंचवडमधील 48 किलोमीटरचे काम पूर्ण 
* चिंचवड ते शिवाजीनगर हे 22 किलोमीटरचे काम सहा महिन्यांत पूर्ण होणार  


रेल्वेने ऑटोमॅटिक सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केली असली, तरी दररोज काही गाड्या दहा ते पंधरा मिनिटे उशिराने धावत असतात. वेळा पाळल्यास प्रवाशांना त्याचा फायदा होईल. 
- इक्‍बाल मुलाणी, अध्यक्ष, रेल्वे प्रवासी संघ 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com