pune : सिंहगड घाटात दरड पडली

वनविभागाच्या वतीने दर काढण्याचे काम सुरू आहे.
pune
punesakal

खडकवासला : सिंहगड, खडकवासला व पानशेत परिसरात मागील पाच सहा दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. परिणामी आज सकाळी सिंहगड घाटात दरड कोसळण्याची घटना घडली आहे

पावसा संदर्भात हवामान खात्याने अतिदक्षतेचा इशारा दिल्यामुळे जिल्हाधिकार्‍यांच्या वतीने कालच पर्यटनस्थळी बंदी करण्यासाठी 144 कलम लागू केलेले आहे.त्या पार्श्वभूमीवर घालण्यात आलेली बंदी योग्य आहे. असे दिसून आले. ही बंदी आजपासून लागू केलेली आहे आणि आजच सिंहगडावरच्या घाटात दरड पडली. ही दरड सिंह घाट रस्त्यावर 28 नंबर या ठिकाणी पडली आहे. म्हणजे घाटातील जगताप माचीपासून पुढे अर्धा किलोमीटरवर ही घटना घडली आहे. घाट रस्ता बंद असल्यामुळे सुदैवाने यात कोणतीही दुर्घटना घडली नाही. वनविभागाच्या वतीने दर काढण्याचे काम सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com