
मंचर: भोसरी येथून दोन लहान मुले बेपत्ता झाल्याची माहिती बुधवारी (ता.२६) रात्री भोसरी पोलीस ठाण्यात पालक देत होते. पोलिसांनी तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सुरु केली होती. पण एस.टी.त झोपलेल्या अवस्थेतील मुलांना वाहक-चालकांच्या सतर्कतेमुळे घोडेगाव (ता.आंबेगाव) पोलिस ठाण्यात नेण्यात आले. पोलिसांनी ताबडतोप मूले सुखरूप असल्याची माहिती भोसरी पोलिसांना कळविल्यानंतर मुलांच्या आईवडिलांनी सुटकेचा निःश्वास सोडला. तब्बल बारा तास बेपत्ता असलेली मुले आई-वडिलांच्या कुशीत गेल्याचे दृश्य पाहून मंचरचे पोलीस व एसटीतील कर्मचाऱ्यांची मने हेलावली.