

Rising Leopard Attacks in Pune District
Sakal
पुणे : जिल्ह्यामध्ये मानवी वस्तीवर बिबट्यांचे हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यापार्श्वभूमीवर एका महिन्यात शिरूर आणि आंबेगाव तालुक्यात १७ बिबटे पकडण्यात आले आहेत. त्याचबरोबर अतिसंवेदनशील गावांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) प्रणाली, सोलार नाईट सर्व्हेलन्स ड्रोन, कॅमेरा ट्रॅप्स, साउंड अलर्ट सिस्टीम ही यंत्रणा कार्यान्वित केली आहे, असे वन विभागाकडून सांगण्यात आले.