Pune :खडकवासला परिसरात बिबट्या, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune

Pune : खडकवासला परिसरात बिबट्या, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

खडकवासला : परिसरातील संरक्षण विभागाच्या डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ आर्मामेंट टेक्नॉलॉजी (DIAT) विभागाच्या हद्दीत बिबट्या आणि कुत्र्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. हा २४ सेकंदाचा व्हिडिओ आहे. यामध्ये डांबरी रस्त्यालगत असलेल्या झाडावर बिबट्या बसलेला आहे. रात्रीची वेळ आहे.

दोन कुत्री झाडाखाली येऊन त्याला भुकत आहे. त्याझाडावरून खाली येतो. दोन्ही कुत्री दोन्ही दिशेला जातात. सुरवातीला व्हिडिओ मध्ये डाव्या बाजुच्या कुत्र्याच्या मागे काही अंतर जातो. तो पुन्हा झाडाजवळ येतो. उजव्या बाजूला कुत्र्याचा काही अंतर पाठीमागे लागतो. परत झाडाजवळ येऊन पुन्हांडाव्या बाजूला जातो. तिकडून पहिला कुत्रा येत आहे. त्याला पकडण्याच्या प्रयत्न करतो पण कुत्रा त्याला चुकवून जातो. बिबट्या तसाच पुढे निघून जातो. दरम्यान, DIAT च्या मिलिट परिसरातील ही घटना आहे. या परिसरात अधिकारी कर्मचारी निवासस्थाने आहेत. येथील रहिवाशांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.

याबाबत, वन विभागाचे पुणे वनसंरक्षक राहुल पाटील यांनी सांगितले की, 'याबाबत एक व्हिडिओ आम्हाला देखील मिळाला आहे. खात्री करण्यासाठी भांबुर्डा वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप संकपाळ यांना संरक्षण विभागाच्या कार्यालयाकडे पाठवले आहे.'

संकपाळ यांनी सांगितले की, 'ही घटना डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ आर्मामेंट टेक्नॉलॉजी (DIAT) हद्दीत हा व्हिडिओ आहे. व्हिडीओ मधील घटना मंगळवारी रात्री साडे दहा वाजताचा आहे. येथील एका कर्मचाऱ्याने हा व्हिडिओ काढला आहे. येथील झाडावर बिबट्याच्या नख्यांच्या ओरखाडा आहे. या ठिकाणी रेस्क्यू टीम बोलविले आहे.'

'घटनास्थळी जाऊन आम्ही पाहणी केली आहे. नागरिकांना काही सूचना दिल्या आहेत. रात्रीच्या वेळी आमचा बंदोबस्त असेल. लहान मुलांना एकटे सोडू नका. गरज भासल्यास आवाज करा, फटाके वाजवा, गाणी वाजवा असे आवाहन येथील नागरिकांमध्ये केले.' असे वन विभागाच्या डोणजे येथील परिमंडळ अधिकारी वैशाली हाडवळे यांनी सांगितले.

Web Title: Pune Leopard In Khadkawasla Video Viral Social Media

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..