

Leopard in pune
esakal
Pune Breaking News: पुण्यातल्या बावधन-पाषाण रस्त्यालगत बिबट्याचं दर्शन झालं आहे. रविवारी मध्यरात्री १२.३० वाजता काहींना बिबट्या दिसला. याचा व्हिडीओदेखील समोर आलाय. पाषाणधील मुख्य रस्त्यावरील हॉटेल डी पॅलेसजवळ हा बिबट्या दिसला. रात्रीच्या वेळी नागरिकांनी घराबाहेर पडणं टाळावं आणि सतर्क राहावं, असं आवाहन करण्यात आलेलं आहे.