

Pune Leopard That Claimed Three Lives Shot Dead by Sharpshooter
Esakal
संजय बारहाते, टाकळी हाजी ता, ५ः पुण्यातल्या शिरूर तालुक्यातील पिंपरखेड गावात दोन लहान मुलांसह तिघांचा बळी घेणाऱ्या बिबट्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. बिबट्यानं दोन आठवड्यात तिघांचा बळी घेतल्यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावऱण होतं. बिबट्याचा बंदोबस्त करावा किंवा त्याला ठार करावं अशी मागणी ग्रामस्थांकडून सातत्यानं होत होती. शेवटी वनविभागाला आदेश मिळाल्यानंतर त्यांनी बिबट्याला गोळ्या घालून संपवलं.