पुणे : कर्ज देण्याच्या बहाण्याने सव्वासहा लाख लंपास; गुन्हा दाखल

विश्रामबाग पोलिस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल
Online vehicle saling fraud in ahmednagar crime news
Online vehicle saling fraud in ahmednagar crime newsesakal

पुणे : फायनान्स कंपनीतुन बोलत असल्याचे सांगून नागरिकास कर्ज देण्याचा बहाणा करून नागरीकाची तब्बल सव्वा सहा लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी विशाल भागवत (वय 37, रा. राजेंद्रनगर) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मार्च ते डिसेंबर 2020 कालावधीत राजेंद्रनगरमध्ये घडली.

Online vehicle saling fraud in ahmednagar crime news
पुणे : टेम्पो चालकास जबर मारहाण करणाऱ्या सराईत गुन्हेगारास अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विशाल भागवत हे एका खासगी कंपनीमध्ये नोकरीला आहेत. 12 मार्च 2020 रोजी त्यांच्या मोबाईलवर एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला. त्याने फिर्यादीस, आपण फायनान्स कंपनीमधून बोलत असल्याचे सांगितले. त्यानंतर फिर्यादीस तत्काळ कर्ज मंजुर करुन देतो, असे सांगितल्याने फिर्यादीने त्याच्यावर विश्‍वास ठेवला. त्यानंतर त्याने फिर्यादीकडून कर्ज घेण्यासाठी आवश्‍यक सर्व कागदपत्रे व्हॉट्‌सऍपद्वारे घेतली.

त्यानंतर कर्ज मिळविण्याच्या प्रक्रियेसाठी रक्कम भरण्यास सांगून त्यांना वेगवेगळ्या बॅंकांचे खातेक्रमांक दिले. त्यानुसार, फिर्यादींनी वेगवेगळ्या बॅंकांच्या खात्यामध्ये 6 लाख 37 हजार रूपये जमा करून घेतले. अनेक दिवस ऊलटूनही कर्ज न मिळाल्यामुळे फिर्यादीने संबंधित व्यक्तीकडे पाठपुरावा केला. मात्र त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील माने करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com