Woman facing verbal abuse over delayed loan repayment by a finance company employee in Pune.
Sakal
पुणे
Pune Loan Harassment : पुण्यात फायनान्स कर्मचाऱ्याचा कर्ज हप्ता न भरल्यावर महिलेस अश्लील शिवीगाळ!
Finance Abuse : पुण्यात फायनान्स कंपनीकडून घेतलेल्या कर्जाचा हप्ता न भरल्यामुळे महिलेस अपमानजनक वर्तन सहन करावे लागले. चंदननगर पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन तपास सुरु केला आहे.
पुणे : फायनान्स कंपनीकडून घेतलेल्या कर्जाचा हप्ता का भरला नाही, या कारणावरून महिलेस अश्लील शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीवर चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ३० नोव्हेंबर रोजी घडला. या प्रकरणी महिलेने चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

