esakal | नाहीतर ससूनबाहेर बेड्स लावण्याची वेळ येईल; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit_Pawar

लॉकडाऊन झाले नाही पाहिजे, असे माझेही मत आहे. परंतु कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. लोक गांभीर्याने घेत नाहीत.

नाहीतर ससूनबाहेर बेड्स लावण्याची वेळ येईल; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इशारा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहर आणि जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. नागरिकांनी संचारबंदीच्या नियमांचे पालन करावे. अन्यथा ससून रुग्णालयाच्या प्रांगणात बेड्स लावण्याची वेळ येईल. ती वेळ येऊ देऊ नका, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. पुणे, पिंपरी चिंचवड शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. या संदर्भात उपाययोजना करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात शुक्रवारी (ता.2) आयोजित बैठकीत पवार बोलत होते.

विद्यार्थ्यांनो, परीक्षेबाबत तक्रार नोंदवा ४८ तासात; पुणे विद्यापीठाकडून नियमावली जाहीर​

या बैठकीस राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी-चिंचवडच्या महापौर उषा ढोरे, खासदार गिरीश बापट, वंदना चव्हाण, श्रीरंग बारणे, अमोल कोल्हे, आमदार भीमराव तापकीर, राहुल कुल, संजय जगताप, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, सहपोलिस आयुक्त रवींद्र शिसवे, पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख, आरोग्य विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते. या वेळी बहुतांश लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी लॉकडाऊनऐवजी कडक निर्बंध असावेत, असे मत मांडले.

म्यानमारच्या लोकांचे भारतात स्थलांतर, परिस्थिती बिघडेल; संयुक्त राष्ट्रांचा इशारा​

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, लॉकडाऊन झाले नाही पाहिजे, असे माझेही मत आहे. परंतु कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. लोक गांभीर्याने घेत नाहीत. रस्त्यावर लोक पोलिसांशी हुज्जत घालतात. बहुतांश लोक नियमांचे पालन करीत नाहीत. उद्या रुग्णालयांमध्ये बेड्स उपलब्ध न झाल्यास काय करणार? नियमांचे पालन न केल्यास ससून रुग्णालयाच्या प्रांगणात बेड्स लावण्याची वेळ येईल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. 
प्रशासनाने रुग्णांना पुरेसे बेड्स उपलब्ध करून द्यावेत. रुग्णालयांमध्ये ऑक्‍सिजनची कमतरता भासणार नाही, याबाबत खबरदारी घ्यावी. इतर आजारांच्या रुग्णांसाठी स्वतंत्र नॉन कोविड रुग्णालय ठेवण्यात यावीत. त्याबाबत नागरिकांना माहिती द्यावी, अशा सूचना पवार यांनी दिल्या.

भारतासोबत संबंध सुधारण्यासाठी पाकिस्तानची काश्मीरवरून अट​

अजित पवारांना फोन लावला तरी बेड मिळणार नाही

सध्या रुग्णसंख्या वाढत चालली आहे. जर ती नियंत्रणाबाहेर गेली तर अजित पवारांना फोन करूनही बेड मिळणार नाही, मग काय कराल? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. लोक सध्या कोणतेही नियम पाळत नाहीत. एखाद्या घरात कोरोना रुग्ण असेल, तर त्या घरातील लोक गावभर फिरतात. याचा काही उपयोग होणार नाही. त्यामुळे प्रशासनातर्फे दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करा, असे आवाहन पवार यांनी केलं आहे.  

- पुणे शहर आणि जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

loading image