पुणे : ४० मिनिटे विमानात बसवून १३५ प्रवाशांना खाली उतरविले

लोहगाव विमानतळावर विमानांत १३५ प्रवाशांना सुमारे चाळीस मिनिटे बसवून ठेवले. त्यानंतर त्यांना कोणतेही कारण न सांगता थेट विमानातून खाली उतरविण्यात आले.
Pune Airport
Pune Airportsakal
Summary

लोहगाव विमानतळावर विमानांत १३५ प्रवाशांना सुमारे चाळीस मिनिटे बसवून ठेवले. त्यानंतर त्यांना कोणतेही कारण न सांगता थेट विमानातून खाली उतरविण्यात आले.

पुणे - पुण्याहून दिल्लीला जाणाऱ्या विमानांत १३५ प्रवाशांना सुमारे चाळीस मिनिटे बसवून ठेवले. त्यानंतर त्यांना कोणतेही कारण न सांगता थेट विमानातून खाली उतरविण्यात आले. प्रवाशांनी क्रू मेंबर्सला या बाबत विचारले असता त्यांना या बाबत ग्राउन्ड स्टाफ माहिती देईल हे सांगत त्यांना थेट खाली उतरविण्यात आले. गुरुवारी दुपारी पुणे विमानतळांवर ही घटना घडली. यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला.

पुण्याहून सायंकाळी ५.४५ मिनिटांनी हे विमान दिल्लीसाठी झेपावणार होते. रात्री ८ वाजता दिल्लीला पोहोचणे अपेक्षित होते. विमानतळावरील सर्व प्रकारच्या तपासण्या झाल्यावर प्रवासी पाच च्या सुमारास विमानांत जाऊन बसले. विमानांची वेळ उलटून गेल्यावर ही विमान झेपावत न्हवते. तेव्हा काही प्रवाशांनी नेमका प्रकार जाणून घेण्यासाठी क्रू मेंबर कडे विचारणा केली. मात्र त्यांना काही सांगण्यात आले नाही. शेवटी चाळीस ४० मिनिटे नंतर प्रवाशांना विमानांतून खाली उतरविण्यात आले. एअरलाइनच्या क्रूने सांगितले की ग्राउंड स्टाफ उत्तरे देईल. तथापि, टर्मिनल बिल्डिंगमध्येही, कोणाकडूनही उत्तर आले नाही नसल्याचे एक प्रवाशाने सांगितले.

विमान सेवा देणाऱ्या कंपनीने प्रवाशांना गुरुवारी रात्रीची ११ वाजून ५० मिनिटाने उड्डाण करणाऱ्या विमानांतून प्रवास करण्यास सांगितले. काहींनी तो पर्याय निवडला. तर काहींनी तिकीट रद्द करून त्याचा परतावा घेऊन विमानतळावरून बाहेर पडले. तर काहींनी शुक्रवारच्या विमानाने दिल्ली गाठण्याचे ठरविले आहे.

प्रवासी संतापले -

आम्ही विमानांत जवळपास ४० मिनिटे बसून होतो. त्यावेळी कोणतेच कारण सांगितले. खाली उतरून आल्यावर सांगण्यात आले विमानात बिघाड झाला. विमान उड्डाण करण्यापूर्वी संबंधित विमान कंपन्या याची तपासणी करीत नाहीत का.हा खूप संताप आणणारा प्रकार आहे.

- क्षितिज लूमकड, विमान प्रवासी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com