Pune Loksabha: एकाच वेळी लाखोंपर्यंत पोहोचण्याची मुरलीधर मोहोळांनी 'रामकथां'च्या माध्यमातून साधली पर्वणी

Pune Loksabha: पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ म्हणजेच अण्णा सध्या एका विषयावरुन चांगलेच चर्चेत आहेत. अर्थात कुठल्या वादग्रस्त विषयासाठी नव्हे तर त्यांनी नुकत्याच आयोजित केलेल्या रामकथेच्या संयोजनासाठी.
pune Lok Sabha election 2024 Murlidhar Mohol ram katha dr kumar Vishwas event
pune Lok Sabha election 2024 Murlidhar Mohol ram katha dr kumar Vishwas event Sakal

पुणे - पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ म्हणजेच अण्णा सध्या एका विषयावरुन चांगलेच चर्चेत आहेत. अर्थात कुठल्या वादग्रस्त विषयासाठी नव्हे तर त्यांनी नुकत्याच आयोजित केलेल्या रामकथेच्या संयोजनासाठी.

२२ जानेवारीला अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा आणि पाचशे वर्षांच्या लढ्यानंतर मिळालेल्या जागेवर बांधलेल्या श्रीराम मंदीराचं लोकार्पण झालं.

तो संपूर्ण आठवडा ज्याच्या त्याच्या तोंडी नांव होतं श्रीरामाचं. रस्तेही भगवे झाले होते. सगळीकडं श्रीरामाच्या प्रतिमा असलेले झेंडे फडकत होते. याच वातावरणात पुण्याच्या मध्यवर्ती भागात पार पडला एक भव्य रामकथा महोत्सव.

हे श्रीरामाच्या कुठल्या मंदिरात आयोजित केलेलं किर्तन नव्हतं. हा होता प्रत्येकाच्या मनातला राम जागवण्याचा महायज्ञ. या यज्ञाचं प्रयोजन केलं होतं मुरलीधर मोहोळ यांनी. प्रसिद्ध कवी, लेखक, व्याख्याते डाॅ. कुमार विश्वास यांच्या 'अपने अपने राम' या तीन दिवसांच्या व्याख्यान सत्राचं आयोजन मोहोळ यांनी संस्कृती प्रतिष्ठान आणि शिक्षण प्रसारक मंडळी यांच्या वतीनं केलं होतं.

pune Lok Sabha election 2024 Murlidhar Mohol ram katha dr kumar Vishwas event
Pune News : भाषा हा वादाचा विषय नसून संवादाचा आहे - डॉ इनामदार

खरं सांगायचं तर रामभक्ती जागवण्याबरोबरच या कार्यक्रमाच्या संयोजनामागचा उद्देश होता एकाचवेळी लाखो लोकांपर्यंत पोहोचण्याचा. श्रीरामाच्या माध्यमातून त्यांच्या मनाशी नाळ जोडण्याचा. आणि मोहोळ यांनी हे नक्कीच साधलं. कार्यक्रमाच्या देखण्या संयोजनापासून ते येणाऱ्या श्रोत्यांना त्रास होऊ नये म्हणून केलेल्या पार्किंग व्यवस्थेपर्यंत सगळं नीटनेटकं होतं याची चर्चा कार्यक्रमानंतर रोजच कानी पडत होती.

राजकीय नेते अनेक कार्यक्रम आयोजित करत असतात. शक्यतो असे कार्यक्रम आपल्या भागात, आपल्या कार्यक्षेत्रात म्हणजेच मतदारसंघात व्हावेत, असा त्यांचा प्रयत्न असतो. शहरातल्या अन्य इच्छुकांनी दिवाळीनंतर आपापल्या विधानसभा मतदारसंघात असे कार्यक्रम आयोजित करायला सुरुवात केली आहे. मात्र, आपलं कार्यक्षेत्र असलेल्या कोथरुडपुरतं मर्यादित न राहता मुरलीधर मोहोळांनी आपलं वेगळेपण जपलं. (Pune Loksabha)

या कार्यक्रमासाठी त्यांनी जी जागा निवडली ती खरोखरच मध्यवर्ती म्हणावी, अशीच. ही जागा होती सदाशिव पेठेतली. एसपी काॅलेजचे मैदान. वास्तविक मोहोळ यांचे खरे कार्यक्षेत्र कोथरुडचे. पण तिथून दूर जाऊन सगळ्या पुणेकरांसाठी कार्यक्रम आयोजित करण्यामागे काही निश्चित उद्दीष्ट होतं असं म्हटलं तर वावगं ठरू नये.

मोहोळ यांनी कार्यक्रमाची जी जागा निवडली तो सगळा परिसर वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघांनी वेढलेला आहे. एका बाजूला पर्वती मतदारसंघ, दुसऱ्या बाजूला कसबा, पूर्वेकडे कँन्टोन्मेंट, पश्चिमेकडे शिवाजीनगर, त्याच्या शेजारी असलेला कोथरुड.

एकाच वेळी पाच विधानसभा मतदारसंघातल्या नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी कार्यक्रमासाठीची ही जागा अत्यंत योग्य ठरली. डाॅ. विश्वास (Kumar Vishwas) यांच्या व्याख्यानांतून मोहोळ यांनी प्रत्येक श्रोत्याला त्याच्या मनातला राम ओळखण्याची संधी तर दिलीच पण शिवाय स्वतःची छबीही त्यांच्या मनापर्यंत पोहोचविण्याची संधी साधली, असंच म्हणावे लागेल.

मोहोळ यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला जवळपास ७०,००० लोक उपस्थित होते. याचा अर्थ पुणे लोकसभेच्या जवळपास ३ लाखाहून अधिक मतदारानापर्यंत यानिमित्ताने मुरलीधर मोहोळ यांचा संपर्क झाला.

pune Lok Sabha election 2024 Murlidhar Mohol ram katha dr kumar Vishwas event
Sanskrit Language : संस्कृत भाषेचा हवा व्यवहारात वापर - रवींद्र साठे

कुमार विश्वास हे डिजिटलवर व्हायरल होणारे नाव! त्यामुळे तरुण वर्ग, हिंदी भाषेतील कार्यक्रम असल्याने सिंधी, अगरवाल असे इतर समाज अशा सर्वांनाच यामुळे जोडून घेता आले. कार्यक्रमाच्या गर्दीवर नजर टाकली असता त्यातील तरुणांची संख्या लक्षणीय होती.

त्यामुळे, आपल्या नियमित मतदारांच्या पुढे जात जास्तीत जास्त नवमतदार मोहोळ यांनी यानिमित्ताने जोडून घेतल्याचे दिसते. (BJP Murlidhar Mohol)

पुणे लोकसभेचे मुरलीधर मोहोळ हे निवडणूक प्रमुख आहेत. त्या त्या ठिकाणच्या निवडणूक प्रमुखांनाच शक्यतो तिकिट मिळणार असे संकेत आहेत. मात्र, लोकसभेची उमेदवारी कोणालाही मिळो, भाजपचा रिच वाढवण्यासाठी मोहोळ यांचे प्रयत्न आता तरी फळाला येताना दिसत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com