Lok Sabha Poll 2024 : पुणे लोकसभा निवडणूक : शिक्षकांनो आठ दिवसांत मतदार शोधा

लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी माहिती चिठ्ठ्या (स्लिप) वाटण्याचे काम केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना (बीएलो) देण्यात आले आहे.
pune lok sabha election teachers need to distribute blo slip politics
pune lok sabha election teachers need to distribute blo slip politicsSakal

वडगाव शेरी : लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी माहिती चिठ्ठ्या (स्लिप) वाटण्याचे काम केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना (बीएलो) देण्यात आले आहे. प्रत्येकाला साधारणता हजार ते बाराशे चिठ्ठ्या आठ दिवसात वाटायच्या आहेत. परंतु या चिठ्ठ्यांवर मतदाराचा पत्ताच नसल्यामुळे कमी वेळात मतदार शोधायचा कसा, असा प्रश्न बीएलओ असलेल्या शिक्षकांना पडला आहे.

प्रत्येक बीएलओ कडे मतदार नोंदणी, दुबार आणि मयत मतदाराचे नाव रद्द करणे, नावात आणि पत्त्यामध्ये दुरुस्ती अशी कामे करायची असतात. तसेच निवडणूक काळात मतदार चिठ्यांचे वाटप करण्याचे काम असते. बीएलओ चे काम बहुतांशी शिक्षकांना देण्यात येते.

वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात 453 बीएलओ आहेत. तर चार लाख 57 हजार इतकी मतदारांची संख्या आहे. या सुमारे साडेचार लाख मतदारांना स्लिपा वाटण्याचे काम या आठ दिवसात बीएलओंना करायचे आहे. प्रत्येक बीएलओ’ला साधारणतः हजार ते बाराशे स्लिपा वाटायच्या आहेत.

प्राथमिक आणि माध्यमिक शाळेचा निकाल चार दिवसांवर आल्यामुळे निकाल बनवण्याचे काम प्रत्येक शाळेत युद्ध पातळीवर सुरू आहे. त्यातच मतदार चिठ्ठ्या वाटण्याचे काम शिक्षकांना आले आहे. मतदार चिठ्ठ्यांवर मतदाराचा फोटो आणि पत्ता, संपर्क क्रमांक नसल्यामुळे आता शिक्षकांना शाळेचा निकाल बनवण्यासोबतच या चिठ्ठ्या वाटण्याचे मोठे आव्हान असणार आहे.

मतदार चिठ्ठ्यांवर मतदाराचा पत्ता का नाही, त्या क्रमाने का लावलेल्या नाहीत आणि त्यावर संपर्क क्रमांक का छापण्यात आला नाही, यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत का घेतली जात नाही, या प्रश्नांची उत्तरे निवडणूक कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी देत नाहीत. ‘केंद्रीय निवडणूक आयोगाकडूनच अशा चिठया आल्याचे मोघम उत्तर अधिकारी सांगतात.

याविषयी निवडणूक कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी म्हणाले, मतदाराचा पत्ता सापडत नसलेल्या बीएलओ’ला आमचे पर्यवेक्षक मदत करतील. जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट बीएलोंना देण्यात आले आहे. त्यातून मतदानाचा टक्का वाढेल.

एकूण मतदार चार लाख 57 हजार

बी एलओ ची संख्या 453.

मतदान केंद्र संख्या 453

निवडणुकीच्या राष्ट्रीय कामात योगदान देत असल्याचे आम्हाला समाधान आहे. मतदार चिठ्ठ्या वाटताना त्यावर जर मतदाराची संपूर्ण आणि अचूक माहिती असेल, चिठया क्रमाने असतील तर हे काम करणे अधिक सोपे होईल. शाळेचा निकाल बनवण्यासोबतच हे काम आम्ही करीत आहोत. - एक शिक्षिका - बीएलओ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com