Chandrakant Dada Patil
Chandrakant Dada Patilesakal

Chandrakant Patil : ...म्हणून विरोधी पक्षाच्या उमेदवाराने विचार करून उभे राहावे

पुणे लोकसभा मतदारसंघातील विधानसभानिहाय पदाधिकाऱ्यांची चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत बैठक

पुणे - 'भाजपसाठी पुणे लोकसभेची निवडणूक अवघड आहे, असा विरोधकांचा समज आहे. या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या सेनेची लाखभर मते कमी झाली, तरी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची दीड लाख मते वाढणार असल्याने आमचे मताधिक्‍य चांगलेच वाढेल. म्हणून विरोधी पक्षाच्या उमेदवाराने विचार करूनच निवडणुकीला उभे राहावे.' अशा शब्दात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विरोधी पक्षांना चिमटा काढला.

पुणे, बारामती, शिरूर लोकसभा क्‍लस्टरच्या प्रमुख पदाची जबाबदारी पाटील यांच्याकडे आहे. त्यानुसार, त्यांनी सोमवारी पुणे लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

पाटील म्हणाले, 'राज्यातील ४८ जागा भाजप जिंकणार असून मोदी फॅक्‍टर अद्यापही कायम आहे. मी स्वतः गणवेश बदलून तुमच्यासोबत येतो, आपण १०० लोकांना भेटून सर्वेक्षण करू. त्यापैकी ९० जणांकडून मोदी यांचेच नाव येईल. यावरूनच मोदी फॅक्‍टर किती लोकांपर्यंत पोचला आहे, हे तुम्हाला कळू शकेल. इलेक्‍ट्रॉल बॉन्डमध्ये कोणत्याही प्रकारचा घोटाळा झालेला नाही.

सगळे पैसे धनादेशाने आले आहेत. त्यामुळे विरोधकांनी किती आरोप केले तरी महाराष्ट्रातील जनतेला त्यासंबंधीचे वास्तव माहीत आहे. 'वसंत मोरे यांनी अपक्ष निवडणूक लढल्यास भाजपला किती फटका बसेल, या प्रश्‍नावर पाटील यांनी भाजपला कमी फटका बसेल, मात्र जास्त फटका मोहन जोशी यांना बसेल, असे सांगत मोहन जोशी हेच विरोधी पक्षाचे उमेदवार असतील, असे अप्रत्यक्षपणे जाहीर केल्याने सगळ्यांच्याच भूवया उंचावल्या.

सोलापूरमध्ये सारेकारी आलबेल नाही

भाजपकडून सोलापूर लोकसभेसाठी उमेदवारीची चाचपणी सुरू आहे. आत्तापर्यंत तीन उमेदवारांबाबत भाजपकडून विचार करण्यात आला आहे. मात्र सोलापूरमध्ये सारे काही अलबेला नसल्याचे पाटील यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या मतदारसंघातील उमेदवाराबाबत लक्ष घातले आहे. ते प्रत्येक गोष्ट तावून सुलाखून घेत असल्याने अनेकांची झोप उडाली असून फडणवीस योग्य उमेदवार देतील, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

फडणवीसांनी काढलेला पत्ता चुकत नाही !

सोलापूरच्या उमेदवाराबाबत बोलताना पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेऊन त्यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले. त्याचवेळी बारामती लोकसभा मतदारसंघासाठी सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीबाबत चर्चा सुरु आहे का ? याविषयी पाटील यांनी "देवेंद्र फडणवीस यांना राजकारणामध्ये जितके लांब दिसते, तितके कोणालाच दिसत नाही. ते कधीच चुकीचा पत्ता काढत नाहीत' असे सूचक विधान केले.

पाटील म्हणाले,

- पवार कुटुंबातील व्यक्तींना एकमेकांबद्दल काय वाटते, याविषयी बोलणार नाही

- रोहित पवार हुशार असतील, तर त्यांनी कोल्हापूरमधील पोलिसांचा अहवाल पहावा

- कोल्हापूरची जागा आमच्याबाजूनेच, अमित शहा यांच्या सांगण्यावरून पुण्यात निवडणूक लढवली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com