Pune Loksabha Result : मोहोळ जिंकले पण 'या' विधानसभेत मतदानात घट, धंगेकरांना कुठं मिळाली सर्वाधिक मते?

Pune Loksabha Result : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना पराभव पत्करावा लागला. मात्र, पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना चांगली आघाडी मिळाली.
Pune Loksabha Result 2024
Pune Loksabha Result 2024esakal

अनिल सावळे

Pune Loksabha Result : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना पराभव पत्करावा लागला. मात्र, पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना चांगली आघाडी मिळाली. महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या तुलनेत धंगेकर यांना १३ हजार २९७ मते अधिक मिळाली आहेत. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराचा कस लागणार असल्याचे चित्र आहे.

दलित, मुस्लिम घटकांची भूमिका महत्त्वाची

या मतदारसंघातून ३५ उमेदवारांनी निवडणूक लढवली. त्यापैकी २७ उमेदवारांना दोन अंकी आकडाही पार करता आला नाही. वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला फटका बसेल, असे सुरुवातीला बोलले जात होते. परंतु ‘वंचित बहुजन’चा करिष्मा दिसून आला नाही. संविधान बदल, महागाईच्या मुद्यांची चर्चा झाली. या मतदारसंघात दलित, मुस्लिम मतदार इतरांच्या तुलनेत अधिक आहेत. त्यामुळे या कॉस्मोपॉलिटन मतदारसंघात महायुतीला पिछाडीवर जावे लागले.

घटक पक्षांची मदत कितपत?

या मतदारसंघात भाजपचे सुनील कांबळे विद्यमान आमदार आहेत. भाजप, काँग्रेसचे प्रत्येकी दोन नगरसेवक होते. या भागात नगरसेवकांकडून त्यांच्या उमेदवारांच्या विजयासाठी प्रयत्न झाले. कासेवाडी, भवानी पेठ, ताडीवाला रस्ता, मंगळवार पेठ, राजेवाडी, वानवडी, घोरपडी गाव आणि कॅन्टोन्मेंटसह काही वॉर्डमधील मतदारांनी धंगेकर यांना आघाडी मिळवून दिली.

बूथनिहाय विश्लेषणातून ही बाब अधिक स्पष्ट होईल. महाविकास आघाडीतील घटक पक्षांतील पदाधिकाऱ्यांकडून रवींद्र धंगेकर यांना सहकार्य झाले. मात्र, पक्षांतर्गत काही नेत्यांच्या नाराजीचा फटका धंगेकर यांना इतर ठिकाणी बसल्याची चर्चा आहे. महायुतीतील घटक पक्षांचे या भागात फारसे प्राबल्य दिसून आले नाही.

Pune Loksabha Result 2024
Loksabha Election Result 2024 :भूसंपादन ठरला कळीचा मुद्दा? अयोध्येत भाजपचं कुठं चुकलं

दोन वेळा कौल, तिसऱ्यांदा पिछाडी

मागील २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पुणे कॅन्टोन्मेंटमधील मतदारांनी भाजपला कौल दिला होता. मागील विधानसभा निवडणुकीतही बहुतांश मतदारांचा कल भाजपकडे राहिला होता. परंतु या निवडणुकीत भाजपला पिछाडीवर जावे लागले. त्याचे चिंतन महायुतीला करावे लागणार आहे.

२०१४च्या लोकसभा निवडणुकीत पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात एक लाख ३९ हजार ४६४ मतदान झाले होते. त्यापैकी ६३ हजार ७९० मते मिळवून भाजपचे अनिल शिरोळे विजयी झाले होते.

प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार डॉ. विश्‍वजित कदम यांना ४९ हजार ८५९ मते मिळाली होती. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात एक लाख ३९ हजार २६ मतदान झाले होते. भाजपचे गिरीश बापट ६७ हजार १७७ मते मिळवून विजयी झाले होते. काँग्रेसचे मोहन जोशी यांना ५४ हजार ४४४ मते मिळाली होती तर वंचित बहुजन आघाडीचे अनिल जाधव यांना १४ हजार ६९९ मते मिळाली होती.

मतदारसंघातील समस्या

  • कासेवाडीत सांडपाणी वाहिन्यांअभावी पावसाळ्यात घरात पाणी शिरल्याने लोकांचे हाल

  • वारंवार रस्ते खोदल्यामुळे रस्त्यांची दुर्दशा

  • सार्वजनिक स्वच्छतागृहांची संख्या अपुरी

  • अस्ताव्यस्त पार्किंग, वाहतूक नियोजनाची गरज

  • भाजी विक्रेत्यांसाठी स्वतंत्र मार्केट बांधणे गरजेचे

Pune Loksabha Result 2024
Pune Loksabha Result 2024esakal

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com