Pune Ransom : प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तरुणाकडे खंडणीची मागणी

तरुणीने कल्याणीनगर येथील एका तरुणाला प्रेमाच्या जाळ्यात ओढून आत्महत्येच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याची घटना समोर आली आहे.
Crime
Crimeesakal

पुणे - तरुणीने कल्याणीनगर येथील एका तरुणाला प्रेमाच्या जाळ्यात ओढून आत्महत्येच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याची घटना समोर आली आहे.

या प्रकरणी येरवडा येथील एका ३२ वर्षीय तरुणाने फिर्याद दिली आहे. त्यावरून येरवडा पोलिसांनी मुंबईतील कळंबोली येथील एका ३० वर्षीय तरुणीवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि तरुणीची २०२१ मध्ये जून महिन्यात एका ऑनलाइन अ‍ॅपद्वारे ओळख झाली. तरुणाला प्रेमाच्या मोहात पाडल्यानंतर ती तरुणाच्या घरी येत होती. त्यानंतर तिने तरुणासह त्याच्या नातेवाइकांचा मानसिक छळ सुरू केला.

फिर्यादी तरुणाच्या कार्यालयामधील कर्मचारी आणि नातेवाइकांकडे बदनामी करेन. तुझ्याविरुद्ध खोटी तक्रार करुन गुन्ह्यात अडकवून टाकेन. तसेच, मी आत्महत्या करीन, अशी धमकी देऊन पाच लाख रुपयांची मागणी केली. त्यामुळे या तरुणाने तिच्या त्रासाला कंटाळून पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com