पर्स यवत स्टेशनजवळ टाकली, शोधा....
दौंड, ता. १ : लखनौ - पुणे एक्सप्रेसमधून एका महिलेची दोन मोबाईल संच असलेली पर्स चोरण्यात आली. चोराने महिलेच्या मोबाईलवरील करण्यात आलेला एक कॅाल घेत पर्स यवत स्टेशनजवळ टाकली, शोधा अन् घेऊन जा ` असा मोबाईलवर सल्ला दिल्याचा प्रकार घडला आहे.
सेवानिवृत्त लष्करी जवान असलेले अनुज कुमार सिंग (वय ५०, रा. खडकी, पुणे ) हे २० फेब्रुवारी रोजी एक्सप्रेसने कानपूर ते पुणे असा कुटुंबीयांसमवेत प्रवास करीत होते. एक्सप्रेस यवत (ता. दौंड) रेल्वे स्थानकावरून निघाल्यावर एका तरुणाने त्यांच्या पत्नीची पर्स उचलून धावत्या रेल्वेतून उडी मारत पळ काढला. पर्समध्ये रोख आठ हजार रुपये, दोन मोबाईल संच, एक मनगटी घड्याळ, एटीएम कार्ड, पॅनकार्ड, आधारकार्ड, आदी ओळखपत्रे, असा एकूण ३२ हजार ६०० रुपयांचा ऐवज होता.
धावत्या एक्सप्रेसमधील या चोरीनंतर अनुज सिंग यांनी पत्नीच्या मोबाईलवर सातत्याने कॅाल केला. दरम्यान चोरट्याने त्यांचा एक कॅाल घेत पर्स यवत रेल्वे स्थानकाजवळ टाकल्याची माहिती देत गुगल लोकेशनच्या साह्याने पर्स शोधण्याचा सल्ला दिला. अनुज सिंग यांनी दौंड लोहमार्ग पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दाखल केली. त्यानंतर दौंड रेल्वे स्थानकापासून सुमारे ३५ किलोमीटर अंतरावरील यवत परिसरात हवालदार अरुण टिंगरे व हवालदार खंडागळे यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सिंग यांच्यासोबत पायपीट करीत पर्सचा शोध घेतला. रेल्वे स्थानकापासून दूर एका माळरानात त्यांना पर्स सापडली. परंतु त्यामधील आठ हजार रुपयांची रोकड चोरट्याने लंपास केलेली होती. लोहमार्ग पोलिसांनी सोपस्कार पूर्ण करून अनुज सिंग यांना पर्स परत केली.
दरम्यान, लोहमार्ग पोलिसांनी सोपस्कार पूर्ण करून अनुज सिंग यांना पर्स परत केली. सिंग सध्या खडकी येथील लष्कराच्या पॅराप्लेजिक रिहॅबिलिटेशन सेंटर येथे नोकरी करीत आहेत.
04497
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

