Pune : भरधाव आलिशान कारची दुभाजकाला धडक; दोघे जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे : भरधाव आलिशान कारची दुभाजकाला धडक; दोघे जखमी
पुणे : भरधाव आलिशान कारची दुभाजकाला धडक; दोघे जखमी

पुणे : भरधाव आलिशान कारची दुभाजकाला धडक; दोघे जखमी

पुणे - भरधाव वेगातील एका आलिशान कारने मंगळवारी रात्री म्हात्रे पुलाजवळील डी.पी. रोडवरील रस्ता दुभाजकाला धडक दिली. एअरबॅग उघडल्याने चालक व त्याच्या शेजारी बसलेल्यांचे प्राण वाचले. मात्र गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.

कार जोरात असल्याने अपघातात तिचे संपूर्ण इंजिन केबिनमध्ये घुसल्याने त्यात अल्पवयीन चालकाचे पाय अडकले होते. त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांनी गाडीचा पुढचा भाग कापून या मुलाची सुटका केली. गाडीतील दोन्ही १७ वर्षाच्या मुलांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

अग्निशमन दलाच्या वतीने दिलेल्या माहितीनुसार, एका आलिशान गाडीतून दोन १७ वर्षाची मुले मंगळवारी (ता. १६) रात्री अडीच वाजता वेगाने डी. पी. रोडवरून म्हात्रे पुलाकडे निघाले होती. वेगामुळे चालकाचे नियंत्रण सुटून कारने दुभाजकाला धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की, या आलिशान गाडीचे इंजिन आत गेले. तर समोरील चाके तुटून पडली. सुदैवाने एअरबॅगमुळे गाडीतील दोघांचे प्राण वाचले. पण चालक युवकाचे दोन्ही पाय गाडीत अडकले होते.

हेही वाचा: पुण्यात होणारी सायन्स कॉंग्रेस रद्द

या अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाली एरंडवणा फायर स्टेशनची गाडी घटनास्थळी रवाना झाली. तसेच मुख्य केंद्रातून रेस्क्यू व्हॅन घटनास्थळी पोचली. अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रेडर व कटरच्या मदतीने गाडीच्या इंजिनाने पार्ट कापून काढले. गाडीचा पुढचा भाग मागे ओढून तब्बल एक तासाच्या प्रयत्नानंतर रात्री तीन वाजून ५० मिनिटांनी अल्पवयीन चालकाची सुटका केली.

याबाबत अग्निशमन दलाचे मंगेश मिलावणे यांनी सांगितले की, गाडीने दुभाजकाला इतकी जोरात धडक दिली होती की, चालकाच्या बाजूची संपूर्ण साइट आत घुसली होती. चाक निखळले होते. कटरने गाडीच्या इंजिनाचा भाग कापून तसेच पुढचा भाग ओढून काढल्यावर मुलाची सुटका करण्यात यश आले.

loading image
go to top