

Maharashtra Sugar Crushing Season Commences
Sakal
पुणे : राज्यातील साखर गाळप हंगामाला शनिवारपासून सुरुवात झाली असून, पहिल्या दिवशी २८ साखर कारखान्यांना गाळप परवाने देण्यात आले आहेत. आणखी ३३ कारखान्यांच्या परवान्यांची तपासणी साखर आयुक्तालयाच्या स्तरावर सुरू असून, दोन दिवसांत त्यावर निर्णय होणार आहे, तर उर्वरित कारखान्यांच्या परवान्यांसाठी कागदपत्रांची पूर्तता आणि निधी भरण्याची प्रक्रिया प्रादेशिक स्तरावर सुरू असल्याची माहिती साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी दिली.