पुणे: बुधवार पेठेत तरूणीचा चाकूने वार करून खून 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 मे 2017

बित्ती शेख उर्फ प्रिती (वय २२, रा. जनता बिल्डींग, बुधवार पेठ) असे खून झालेल्या तरूणीचे नाव आहे. तर सुखदेव रामदास मडावी (वय २७, रा. वडारवाडी, मुळ यवतमाळ) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या प्रियकराचे नाव आहे.

पुणे - संबंध तोडल्याच्या आणि फोन घेत नसल्याच्या रागातून प्रियकराने प्रेयसीवर चाकून वार करून तिचा खून केल्याची घटना मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास बुधवार पेठेत घडली. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी प्रियकराला ताब्यात घेतले आहे. दरम्यान पेठेतील महिलांनी आरोपीला चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले.

बित्ती शेख उर्फ प्रिती (वय २२, रा. जनता बिल्डींग, बुधवार पेठ) असे खून झालेल्या तरूणीचे नाव आहे. तर सुखदेव रामदास मडावी (वय २७, रा. वडारवाडी, मुळ यवतमाळ) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या प्रियकराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत बित्ती शेख ही बुधवार पेठेमध्ये देहविक्रीय करत होती. तिचे आणि सुखदेव मडावी यांचे दोन वर्षापूर्वी प्रेमसंबंध होते. ते दोघे एकत्र वडारवाडी येथे रहात होते. सहा महिन्यांपासून सुखदेव याला काम नव्हते. पैशाच्या कारणावरून दोघांमध्ये वाद होत होते. त्यामुळे ती घरातून निघून गेली. त्यानंतर ती बुधवार पेठेत असल्याचे सुखदेवला समजले. तो तिला भेटण्यासाठी वारंवार बुधवार पेठेत येत होता. पण ती भेटत नव्हती. तो तिला फोनही करत असे मात्र ती त्याचा फोन घेत नव्हती. तो मिळेत ते काम करून फिरस्त्या पद्धतीने रहात होता. 

मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास तो बुधवार पेठेत आला होता. त्यावेळी त्याला बित्ती शेख दिसली. त्याला ती टाळत असल्याच्या व फोन उचलत नसल्याच्या रागातून त्याने तिच्यावर चाकूने वार केले. या हल्ल्यात तिचा जागीच मृत्यू झाला. यावेळी बित्ती शेख हिच्या आसपास असलेल्या महिलांनी सुखदेव मडावी याला चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून बित्ती शेख हिचे शव विच्छेदनासाठी ससून रुग्णालयात नेण्यात आले.

Web Title: Pune: man killed women in budhwar peth

टॅग्स