esakal | पुणेकराने उघडकीस आणली पंतप्रधान सहायता निधीतील 'हॅकिंग'
sakal

बोलून बातमी शोधा

Pune man reveals hacking in Prime Ministers National Relief Fund

कोरोनाविरुद्धच्या लढाईत सधन नागरिकांनी आर्थिक मदत करावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. लोकांना ऑनलाईन पद्धतीने 'प्रधानमंत्री सहायता निधी'त योगदान देता यावे, म्हणून एक 'युपीआय'क्रमांक ही जाहीर केला. परंतु, पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या क्रमांकाशी बरेचसे साम्य दाखवणारा खोटा क्रमांकही अस्तित्वात होता. यामुळे क्रमांकात थोडी चूक करणाऱ्या नागरिकांचे लाखो रुपये चूकीच्या व्यक्तीला गेले असते.

पुणेकराने उघडकीस आणली पंतप्रधान सहायता निधीतील 'हॅकिंग'

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : खरेदी केल्यावर किंवा कुणाला पैसे पाठवायचे असेल, तर आपण सर्रासपणे ऑनलाईन पद्धतीचा अवलंब करतो. त्यासाठी अतिशय सुलभ असलेला 'युपीआय' क्रमांक नोंदवून पैसे 'सेंड' करतो. पण, या क्रमांकातील एखादे अक्षर चुकले तर, पैसे चुकीच्या व्यक्तीलाही जाऊ शकतात. आणि जर हा प्रकार 'पंतप्रधान सहायता निधी' सोबत झाला तर, कल्पनाच नको. असा दिशाभूल करणारा क्रमांक एका पुणेकराने उघडकीस आणला आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाविरुद्धच्या लढाईत सधन नागरिकांनी आर्थिक मदत करावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. लोकांना ऑनलाईन पद्धतीने 'प्रधानमंत्री सहायता निधी'त योगदान देता यावे, म्हणून एक 'युपीआय'क्रमांक ही जाहीर केला. परंतु, पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या क्रमांकाशी बरेचसे साम्य दाखवणारा खोटा क्रमांकही अस्तित्वात होता. यामुळे क्रमांकात थोडी चूक करणाऱ्या नागरिकांचे लाखो रुपये चूकीच्या व्यक्तीला गेले असते.

महाराष्ट्रापुढे आव्हान : कोरोना रुग्णांवर उपचार करायचे तरी कसे?
पाषाण परिसरातील पंचवटी येथील रहिवासी चंद्रशेखर शिसोदे यांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे. पंतप्रधानांनी जाहीर केला क्रमांक pmcares@sbi असा आहे. यांच्याशीच साम्य दाखवणारा, पण ज्यामध्ये शेवटचे अक्षर 'एस' नाही असा pmcare@sbi युपीआय क्रमांकही अस्तित्वात आहे. अशा क्रमांकामुळे नागरिकांचे पैसे वेगळ्याच खात्यावर जाण्याची शक्यता आहे. हा धोका ओळखून शिसोदे यांनी भारतीय स्टेट बँक आणि प्रधानमंत्री कार्यालयाला ट्विटर द्वारे कळवले. स्टेट बँकेने याची दखल घेत तातडीने, खोटा असलेला युपीआय क्रमांक हटवला. शिसोदे यांच्या सजगतेमुळे कोट्यवधी रुपयांचा घोटाळा थांबला आहे. नागरिकांनीही सहायता निधी पाठवताना योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.
coronavirus: पुणे पोलिसांकडून 3665 जणांना "क्‍युआर कोड" 
करोना हे जागतिक संकट आहे. याचा मुकाबला करण्यासाठी आपल्या सारख्या विकसनशील देशातील नागरिकांनी जमेल तशी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान सहायता निधीला आर्थिक मदत करावयास हवी. आर्थिक दान करताना कृपया खाते क्रमांक आणि युपीआय क्रमांक दोनदा तपासूनच पैसे पाठवावेत. 
- चंद्रशेखर शिसोदे
 
loading image