Pune Crime News
esakal
पुण्यातील शिवाजीनगर जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात मंदार किवळे याच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. हल्ल्यानंतर पळून गेलेल्या पाच संशयित आरोपींना पोलिसांनी दौंड येथून ताब्यात घेतलं आहे. हल्लेखोर सोलापूरच्या दिशेने जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून गाडी अडवली आणि त्यांना पकडलं. आता या आरोपींना पुण्यात आणलं जाणार असून, त्यांची कसून चौकशी केली जाणार आहे.