esakal | मार्केटयार्डात भरदिवसा दिवाणजीला लुटले; वाचा चोरट्यांनी कसे लांबवले सव्वातीन लाख
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

ओस्तवाल हे दुचाकीवर बाहेर पडल्यानंतर काही मिनिटातच त्यांच्या दुचाकीला तिघांनी त्यांची दुचाकी आडवी घातली. त्यांना तुम्हाला दुचाकी चालवता येत नाही का? म्हणत त्यांच्याशी हुज्जत घातली.

मार्केटयार्डात भरदिवसा दिवाणजीला लुटले; वाचा चोरट्यांनी कसे लांबवले सव्वातीन लाख

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : व्यापारातून जमा झालेली रक्कम बॅंकेत भरण्यासाठी निघालेल्या एका व्यापाऱ्याच्या दिवाणजीला दुचाकीवरून आलेल्या तिघांनी रस्त्यात गाठून तीन लाख ३० हजारांची रक्कम लांबवली. बुधवारी (ता.२९) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास मार्केटयार्ड परिसरात ही घटना घडली. चोरट्यांनी रॉडने केलेल्या हल्ल्यात दिवाणजी जखमी झाले आहेत.

तेलाच्या व्यापाऱ्याकडे दिवाण म्हणून नोकरीस असलेल्या सुमंतीलाल चंदनलाल ओस्तवाल (वय ६९, रा. गंगानगर, आकुर्डी प्राधिकरण) यांनी याबाबत मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दुचाकीवर आलेल्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यात फ्लॅट, रुम्स शोधताय? फेसबुकवरील 'या' ग्रुपची तुम्हाला होईल मदत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रायकुमार नहार हे तेलाचे व्यापारी असून त्यांचा मार्केटयार्डात त्यांचा गाळा आहे. तेथे ओस्तवाल कामाला आहेत. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ओस्तवाल हे व्यापारातून जमा झालेले तीन लाख ३० हजार रुपये बॅंकेत भरण्यासाठी त्यांच्या दुचाकीवरून जात होते. पैशाची बॅग त्यांनी दुचाकीला मागील बाजूस अडकवली होती. ओस्तवाल हे दुचाकीवर बाहेर पडल्यानंतर काही मिनिटातच त्यांच्या दुचाकीला तिघांनी त्यांची दुचाकी आडवी घातली. त्यांना तुम्हाला दुचाकी चालवता येत नाही का? म्हणत त्यांच्याशी हुज्जत घातली.

शेतकऱ्यांनो, पीक विमा योजनेबाबत कृषी आयुक्तालयाने जाहीर केली महत्त्वाची सूचना​

याच दरम्यान त्यातील एकाने दुचाकीच्या हुकाला अडकवलेली पैशाची बॅग हिसकाऊन घेतली. ओस्तवाल यांनी त्या चोरट्यांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यातील एकाने रॉड त्यांच्या डोक्‍यात मारली आणि रक्कम असलेली बॅग चोरली. परिसरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिस आरोपींचा माग काढत आहेत. गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक जी. जी. खरात करीत आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

loading image
go to top