Pune Market Yard Traders shop will take in Possession at who do not support system
Pune Market Yard Traders shop will take in Possession at who do not support system

व्यवस्थापनात सहभगी न होणाऱ्या अडत्यांचे गाळे घेणार ताब्यात

मार्केटयार्ड(पुणे) : बाजार समिती व्यवस्थापन म्हणून बाजारातील जे अडते यामध्ये सहभागी होणार नाहीत. त्या अडत्यांचे गाळे आपत्ती व्यवस्थापन आणि बाजार समिती कायद्यान्वये ताब्यात घेण्यात येतील. तसेच बाजारात जे व्यापार करणारे अडते आहेत त्यांना तात्पुरत्या स्वरूपात परवाने देऊन बाजार चालवला जाणार असल्याची माहिती बाजार समितीचे प्रशासक बी जे. देशमुख यांनी दिली.

Coronavirus : कोरोना व्हायरसचा फोटो समोर; कसा आहे कोरोना पाहाच!

देशमुख म्हणाले, काही लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून बाजार बंदची अफवा पसरवत आहेत. बाजार सुरळीत चालू आहे. अफवा पसरवणाऱ्या विरोधात कारवाई केली जाईल. बाजारातील बहुसंख्य अडते, कामगार काम करण्यास तयार झालेले आहेत. शासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करून सर्वांनी बाजार चालवणे आवश्यक आहे. सध्याच्या परिस्थितीत बाजार चालवण्यासाठी काही तत्कालीन उपाययोजना केल्या आहेत. शहरात सगळीकडे भाजीपाला जाणे आवश्यक आहेत. त्यामुळे नागरिकांची आणि शेतकऱ्यांची सोय होणार आहे. त्यासाठी सर्वांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. तसेच बाजार संबधित सर्व घटकांना ओळखपत्र आणि स्टिकर देण्याचे काम चालू आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
कोरोना प्रादुर्भाव होऊ नये म्हणून बाजार समिती प्रशासन सर्व खबरदारी घेत आहे. बाजारात 'सोशल डिस्टन्स' ठेवला जात आहे. त्यामुळे नागरिकांना चिंता करण्याची गरज नसून घराजवळ भाजीपाला आणि फळे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. शनिवारी उपबाजारात सुमारे ६०० गाड्यांची अवाक झाली आहे. मात्र खरेदीसाठी फक्त ठोक विक्रेत्यांनी यावे. ठोक व्यापारी माल घेऊन सर्व भागातील विक्रेत्यांना देतील. मात्र बाजार समितीत थेट नागरिकांनी गर्दी करू नये. घराजवळ सर्व माल उपलब्ध होईल. किरकोळ खरेदीदारांना बाजारात प्रवेश दिला जाणार नाही. तसेच यापुढे बाजार समिती नियमित सुरु राहणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी; पीककर्ज परतफेडीला मुदतवाढ!

बाजाराची रचना एक दिवसाआड व वेळेत बदल
बाजारात गर्दी होऊ नये म्हणून एक दिवस तरकरी भाजीपाला विभाग आणि एक दिवस फळे, कांदा बटाटा विभाग सुरु ठेवण्यात येणार आहे. त्यामध्ये बाजार आवारात अलेलेला शेतीमाल उतरवण्याची वेळी ही रात्री ९:०० ते पहाटे ४:०० वाजेपर्यंत राहील. तर रविवारी तरकरी भाजीपाला विक्रीची वेळ ही पहाटे ४:३० ते सकाळी १०:३० पर्यंत राहील. तसेच सोमवारी फळे, कांदा बटाटा विभागातील विक्रीची वेळ ही सकाळी ६:०० ते दुपारी १२:०० पर्यंत राहणार आहे. त्यानुसार पुढे बाजाराची रचना एक दिवसाआड केली आहे.

- विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; 'नीट' परीक्षेस स्थगिती!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com