Pune woman files FIR for marriage fraud after husband hid impotency; six accused in dowry and harassment case.
पुणे
Pune Marriage Fraud : ‘सांगितले तर परिणाम भोगाल’; नपुंसकतेची माहिती लपवून लग्न; पतीसह सहाजणांविरुद्ध गुन्हा!
Marriage Cheating Case : नपुंसकतेची माहिती लपवून विवाह केल्याचा आणि विवाहानंतर तरुणीचा शारीरिक-मानसिक छळ केल्याचा गंभीर आरोप पतीसह सहाजणांवर करण्यात आला आहे. समर्थ पोलिसांनी या प्रकरणी फौजदारी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
पुणे : पती नपुंसक असल्याची माहिती लपवून विवाह करून फसवणूक केल्याप्रकरणी तरुणीच्या पतीसह सहाजणांविरुद्ध समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार २३ वर्षीय तरुणीने पती, सासू-सासरा, नणंद, तिचा पती आणि चुलत सासरा यांच्यावर आरोप केले आहेत. तरुणीने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, १८ एप्रिल रोजी तिचा ३२ वर्षीय तरुणाशी विवाह झाला. मात्र विवाहानंतर काही दिवसांनी पती नपुंसक असल्याचे तिच्या लक्षात आले.
