Pune Fire News : पुण्यात मॉडर्न डेअरीच्या छतावर भीषण आग; एकाच दिवशी तीन आगीच्या घटना

शहरातील सेंट्रल स्ट्रीट, श्रीकृष्ण तरुण मंडळ चौकात मॉडर्न डेअरीच्या छतावर मोठ्या प्रमाणात आग लागल्याची घटना घडली आहे. ही डेअरी दुमजली असून त्यावरील टेरेसवर लोखंडी स्ट्रक्चर व पञा शेड टाकण्यात आले होते.
Pune Fire News
Pune Fire Newsesakal

कॅन्टोन्मेंट: पुणे शहरातील सेंट्रल स्ट्रीट, श्रीकृष्ण तरुण मंडळ चौकात मॉडर्न डेअरीच्या छतावर मोठ्या प्रमाणात आग लागल्याची घटना घडली आहे. ही डेअरी दुमजली असून त्यावरील टेरेसवर लोखंडी स्ट्रक्चर व पञा शेड टाकण्यात आले होते. आगीने मोठा पेट घेतल्याने छतावरील सर्व साहित्य जळून खाक झाले.

आग लागल्यानंतर तातडीने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. पुणे अग्निशमन दल कोंढवा, नायडू, गंगाधाम येथील फायरगाड्या व दोन वॉटर टँकर घटनास्थळी रवाना करण्यात आले. घटनास्थळी जवानांनी चार ही बाजूने पाण्याचा मारा करत सुमारे वीस मिनिटात आग आटोक्यात आणत धोका दूर केला.

Pune Fire News
Manoj Jarange : ''अडीच कोटी मराठे ओबीसीत जाणार'', मनोज जरांगेंचा दावा; सदावर्तेंच्या याचिकेवर बुधवारी सुनावणी

नंतर कुलिंग ऑपरेशन सुरू ठेवण्यात आले होते. काही वेळात आग पूर्ण विझली असून सदर ठिकाणी छतावरील लोखंडी कॉलम वाकले आहेत. येथे डेअरीसाठी वापरण्यात येणारे पॅकिंग मटेरियल मोठ्या प्रमाणात पेटले होते. यामध्ये कागद, पुठ्ठा, थर्मोकोल व जनरेटर आदी साहित्य होते.

सुदैवाने घटनास्थळी जीवितहानी झाली नाही. छतावर आग फटाक्यांमुळे लागली असे स्थानिकांकडून व डेअरी मालक यांच्याकडून सांगण्यात आले. डेअरीच्या इतर दोन मजल्यावर कोणतेही नुकसान झालेले नाही. अग्निशमन सहाय्यक विभागीय अग्निशमन अधिकारी विजय भिलारे, कोंढवा अग्निशमन प्रभारी अधिकारी कैलास शिंदे उपस्थित होते. ही माहिती अग्निशमन विभागाकडून पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड विभागाचे अग्निशमनदल अधिकारी रोहित रणपिसे यांनी दिली यांनी दिली.

Pune Fire News
Ayodhya Ram Mandir : अयोध्येहून परतताच पंतप्रधान मोदींनी केली 'या' योजनेची घोषणा; एक कोटी कुटुंबांना होणार फायदा

एकाच दिवशी तीन आगीच्या घटना

  • सोमवारी दुपारी पुण्यातील कुमठेकर रस्ता येथे एका इमारतीत दुसऱ्या मजल्यावरील सदनिकेत आग लागली. या आगीत घरगुती साहित्य जळून खाक झाले. आगीच कारण समजू शकले नाही.

  • दुसऱ्या घटनेत कसबा पेठ, तांबट हौद येथील एका वाड्यात घरामध्ये आग लागली. सदनिकेतील आग जवानांनी विझवत धोका दूर केला. तसेच स्थानिकांनी वेळेत आग आटोक्यात आणली म्हणून धोका टळला.

  • पुण्यामध्ये आगीची तिसरी आगीची घटना कॅन्टोमेंट परिसरात रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. शिवाजी मार्केट नजीक मॉडर्न डेअरीमध्ये फटाक्यामुळे आग लागली. अग्निशमन दलाकडून ४ फायर गाड्या व २ वॉटर टँकरच्या मदतीने आग आटोक्यात आणली गेली. या घटनांमध्ये जीवितहानी झालेली नसून नुकसान झाल्याची माहिती आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com