

BJP Faces Internal Rift Over Pune Mayor Candidate Congress Adds Pressure
Esakal
Pune Mayor News: पुण्यात भाजपने महापौरपदासाठी मंजुषा नागपुरे यांना संधी दिलीय. मंजुषा नागपुरे यांच्यासह तीन महिलांच्या नावांची चर्चा होती. पण भाजपने मंजुषा नागपुरे यांना महापौर पदाची उमेदवारी दिल्यानं आता नाराजी उफाळून आलीय. भाजपच्या नगरसेविका वर्षा तापकिर या नाराज झाल्या आहेत. वर्षा तापकीर यासुद्धा महापौर पदाच्या दावेदार मानल्या जात होत्या.