esakal | Pune: ९८७ बीएएमएस वैद्यकीय अधिकारी पदोन्नतीच्या प्रतिक्षेत
sakal

बोलून बातमी शोधा

वैद्यकीय अधिकारी पदांची भरती!

पुणे : ९८७ बीएएमएस वैद्यकीय अधिकारी पदोन्नतीच्या प्रतिक्षेत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

उंड्री : सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये गट अ व ब असे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे संवर्ग असून, ब संवर्गात पुणे जिल्ह्यातील ५१, तर राज्यातील ९८७ वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. मात्र, १९९८ पासून म्हणजे २३ वर्षानंतर आजपर्यंत एकाही गट ब वैद्यकीय अधिकाऱ्यांना पदोन्नती दिली नाही. त्यामुळे ब गटातील वैद्यकीय अधिकारी सेवानिवृत्त झाले. संविधानाने दिेलेल्या पदोन्नतीच्या हक्कापासून ब संवर्गातील वैद्यकीय अधिकारी वंचित राहिले असून, त्यांच्यावर अन्याय होत आहे. त्यामुळे वैद्यकीय अधिकारी ब गट अ संवर्गात समावेश करावा यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आल्याचे महाराष्ट्र वैद्यकीय अधिकारी महासंघाच्या पुणे शाखेचे जिल्हा समन्वयक डॉ. विनोद स्वामी यांनी सांगितले.

याप्रसंगी महाराष्ट्र वैद्यकीय अधिकारी महासंघ पुणे शाखेचे जिल्हा समन्वयक डॉ. विनोद स्वामी, डॉ. तुषार पवार, डॉ. अजय पायघन, डॉ. अरुंधती धात्र, डॉ. गजेंद्र बावस्कर व डॉ. शिवांजली करांडे उपस्थित होते.

हेही वाचा: नरखेड पंचायत समितीत भाजपला एन्ट्री

दरम्यान, महाराष्ट्र वैद्यकीय अधिकारी महासंघाच्या पुणे शाखेचे अध्यक्ष डॉ. तुषार पवार म्हणाले की, गट अ व गट ब वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवाप्रेवश नियमानुसार शैक्षणिक पात्रता एमबीबीएस व बीएएमएस समान असून, २५ टक्के पदे बीएएमएस पदवीधारकांसाठी राखीव आहेत. मात्र, मागिल २३ वर्षांचा अनुशेष पाहता शासनाने ९८७ गट ब वैद्यकीय अधिकाऱ्यांचे अ वर्गात समावेश केला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

loading image
go to top