esakal | Nagpur: नरखेड पंचायत समितीत भाजपला एन्ट्री
sakal

बोलून बातमी शोधा

bjp

नरखेड पंचायत समितीत भाजपला एन्ट्री

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जलालखेडा : मंगळवार ( ता. ५ ) ला पार पडलेल्या नरखेड पंचायत समितीच्या दोन जागेवर झालेल्या पोटनिवडणुकिची मतमोजनी आज ( ता. ६ ) पंचायत समितीच्या तहसील कार्यालयात पार पडली. यात भाजपच्या दोन्ही ही उमेदवारांनी विजयश्री खेचत पंचायत समितीत भाजपची एन्ट्री करून दिली. यापूर्वी पंचायत समितीत आठ ही सदस्य हे राष्ट्रवादी कांग्रेसचे च होते. आता राष्ट्रवादी कांग्रेस सहा व भाजप दोन असा संख्याबळ पंचायत समितीत झाला आहे.

नरखेड पंचायत समितीत इतर मागासवर्गीय आरक्षणात दोन जागा रिक्त झाल्या होत्या. यात उपसभापती वैभव दळवी यांचा देखील समावेश होता. पंचायत समिती सर्कल सावरगाव मधून भाजपचे स्वप्नील नागापुरे यांनी अपक्ष उमेदवार प्रवीण वासाडे यांच्यावर निसटा दोन मतांनी विजय मिळविला तर राष्ट्रवादी कांग्रेसचे उमेदवार तथा माजी सभापती वैभव दळवी यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. तर पंचायत समिती सर्कल बेलोना मधून जुन्या सदस्या रश्मी आरघोडे यांना राष्ट्रवादी कांग्रेसने उमेदवारी नाकारली व नवीन उमेदवार अपर्णा भुक्ते यांना रिंगणात उतरविले. पण रश्मी आरघोडे यांनी बद्खोरी करीत निवडणूक लढविली. यात भाजपच्या हेमलता सातपुते ५०८ मतांनी विजयी झाल्या.

हेही वाचा: बेळगाव : हार नाही मानणार; रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांनी कसली कंबर

२०२० मध्ये झालेल्या निवडणुकीत माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यावर विश्वास दाखवत मतदारांनी पंचायत समितीच्या सर्व आठ जागा राष्ट्रवादी कांग्रेसच्या पारड्यात टाकल्या होत्या. अन्य पक्षाला पंचायत समितीत एन्ट्री सुद्धा मिळाली नव्हती. पण आता दीड वर्षानंतर झालेल्या पोट निवडणुकीत माजी मंत्री अनिल देशमुख अनुपस्थिती जाणवली व पक्षाला बंडखोरी शमविण्यात अपयश आले व याचाच लाभ भाजप पक्षाला झाला व त्यांचे दोन उमेदवार विजयी झाले व त्यांना पंचायत समितीत एन्ट्री मिळाली. दोन्ही मतदारसंघात झालेल्या बंडखोरीचा लाभ भाजपला झाला असला तरी मात्र शिवसेना याचा लाभ उचलू शकली नाही व त्यांना दोन्ही जागेवर शेवटी राहावे लागले.

पंचायत समिती सर्कल बेलोना (सर्वसाधारण - महिला)

अ. क्र. उमेदवारांची नावे पक्ष मिळालेली मते

१) हेमलता गोपाल सातपुते भाजप २७२९

२ ) रश्मी अशोक आरघोडे अपक्ष ११८९

३ ) ललिता धनराज कनिरे शिवसेना ३७९

४ ) अपर्णा अरुण भुक्ते राष्ट्रवादी काँग्रेस २२२१

५) नोटा १४४

हेही वाचा: नरखेड पंचायत समितीत भाजपला एन्ट्री

भाजपच्या हेमलता सातपुते यांचा ५०८ मतांनी विजय झाला.

पंचायत समिती सर्कल सावरगाव ( सर्वसाधारण )

अ.क्र. विजयी उमेदवार पक्ष मिळालेली मते

१) स्वप्नील अनंतराम नागापूरे भाजप १८६८

२ ) राजू मोतीरामजी गिरडकर शिवसेना ९५४

३ ) वैभव वासुदेव दळवी राष्ट्रवादी १७९८

४ ) गौरव रमेश रेवतकर अपक्ष १६१९

५) प्रवीण वामन वासाडे अपक्ष १८६६

नोटा ११०

भाजपचे स्वप्नील नागापुरे यांनी अपक्ष उमेदवार प्रवीण वासाडे यांचा २ मतांनी पराभव करून विजय मिळविला. तर राष्ट्रवादी कांग्रेसचे वैभव दळवी यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.

loading image
go to top