Pune : दि पूना मर्चंटस् चेंबरचे सभासद संभ्रमात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune : दि पूना मर्चंटस् चेंबर

Pune : दि पूना मर्चंटस् चेंबरचे सभासद संभ्रमात

पुणे : दि पूना मर्चंटस् चेंबरच्या निवडणुकीचा पेच अजूनही कायम आहे. त्यामुळे मतदान कधी होणार याबाबत चेंबरचे सभासद संभ्रमात आहेत. चेंबरची सर्वसाधारण सभा (ता. २६) सकाळी ९:०० वाजता होणार आहे. त्यामध्ये सर्वानुमते यावर निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दि पूना मर्चंटस् चेंबरची निवडणूक प्रक्रिया सुरू असताना निवडणुक अधिकारी यांनी अचानकपणे मेलद्वारे राजीनामा दिला होता. त्यामुळे बुधवारी (ता. २३) सायंकाळी झालेल्या चेंबरच्या कार्यकारिणीत निवडणुक अधिकारी म्हणून ॲड. मकरंद आडकर यांची नियुक्ती करण्याचा ठराव करण्यात आला आहे. नियुक्ती पत्र गुरुवारी आडकर यांना देण्यात आले. त्यांच्यासोबत सहाय्यक अधिकारी म्हणून दोघेजण काम पाहणार आहेत. त्यांनतर निवडणूक अधिकारी थांबलेल्या चेंबरच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू करणार आहेत. त्यामुळे थांबलेली प्रक्रिया पुन्हा सुरू होणार आहे. परंतु अद्यापही मतदान कोणत्या दिवशी होणार हे स्पष्ट झालेले नाही. सर्वसाधारण सभा (ता. २६) सकाळी ९:०० वाजता होणार आहे. यामध्ये निर्णय सर्वानुमते निर्णय होणार आहे.

हेही वाचा: वानखेडे कुटुंबियांविरोधातील नवाब मलिकांच्या आरोपांना लागणार ब्रेक!

बहुतांशी निवडणूक प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. त्यामुळे नव्याने संपूर्ण निवडणूक प्रक्रिया घेण्याची कोणतीही आवश्यकता नाही. जबाबदार निर्वाचन अधिकारी म्हणून उर्वरित निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडणे गरजेचे आहे. निवडणूक अधिकारी राजीनामा देऊन गेल्यामुळे नवीन निवडणूक अधिकारी नेमण्यासाठी कार्यकारणी सभा झाली. निवडणूक आधिकऱ्याबाबत आणि त्यांच्या मोबदल्याबाबत विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांचे मोबदला व पुढील प्रक्रियेस किती अवधी लागणार याबाबत खुलासा मिळाला नाही. एकतर्फी आणि चर्चेविना एकूणच निवडणूक प्रक्रिया संशयास्पद वाटत असल्याचं आरोप चेंबरचे माजी अध्यक्ष राजेंद्र बाठिया यांनी पत्रकार परिषदेत केला. यावेळी अजित बोरा, ईश्वर नहार, रायकुमार नहार, नवीन गोयल उपस्थित होते. तसेच निवडणूक अधिकारी यांनाही पत्र व्यवहार केल्याचे बाठिया यांनी सांगितले.

हेही वाचा: वानखेडे कुटुंबियांविरोधातील नवाब मलिकांच्या आरोपांना लागणार ब्रेक!

मतदान कधी याबाबत संभ्रम

दि पूना मर्चंटस् चेंबरच्या निवडणुकीत निर्माण झालेला आहे अद्यापही कायम आहे. त्यामुळे चेंबरचे मतदान कधी होणार याबाबत संभ्रम कायम आहे. अद्यापही उमेदवार कोण आहेत याबाबत अंतिम यादी प्रसिद्ध झालेली नाही. तसेच बॅलेट पेपर ही तयार झालेले नाहीत. त्यामुळे ही निवडणूक प्रक्रियाच पुढे ढकलली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

"निवडणुकीची सर्व प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडण्यासाठी सर्व कार्यकारणच्या समोर सील केलेली कागदपत्रे निवडणूक अधिकारी यांच्याकडे देण्यात आली आहेत. ते सर्व कागदपत्रे तपासून निर्णय घेतील. तसेच शुक्रवारी सकाळी सर्वसाधारण सभा आहे. यामध्ये अंतिम निर्णय होईल."

- विजय मुथा, सचिव, दि पूना मर्चंटस् चेंबर

loading image
go to top