Pune: ड्रग्सचा विळखा काही सुटेना.. पुण्यातील 'या' ठिकाणी सापडला तब्बल ४० लाखाचा मेफेड्रोन!
Latest Pune News: पोलिसांच्या पथकाने शेखच्या घरातून ४० लाख रुपयांचे २०२ ग्रॅम मेफेड्रोन, देशी बनावटीचे पिस्तूल व मोबाईल असा ४२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
Latest Drug News: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अमली पदार्थ विरोधी पथकाने कोंढव्यात छापा टाकून ४० लाख रुपयांचे मेफेड्रोन आणि देशी बनावटीचे पिस्तूल जप्त केले. कोंढव्यातील भाग्योदयनगर परिसरात ही कारवाई करण्यात आली. त्यात एकाला ताब्यात घेण्यात आले आहे.