

Pune Metro Nears Major Milestone as 19 km Work Completed
Sakal
पुणे/बाणेर : माण ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक(आचार्य आनंदऋषीजी चौक)दरम्यान १९ किलोमीटर लांबीच्या मेट्रोची पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) यशस्वी चाचणी घेण्यात आली. त्यामुळे मार्चअखेरपर्यंत शिवाजीनगरदरम्यान मेट्रोचे काम पूर्ण करून प्रवाशांसाठी मार्ग खुला करण्याचा प्रयत्न प्राधिकरणाकडून करण्यात येणार आहे. त्यामुळे पुण्यातील तिसरा मेट्रो मार्ग प्रवाशांसाठी खुला होईल.