आम्ही पण माणसं आहोत (व्हिडिओ)

metro workers
metro workers

पुणे: पौडरस्त्यावर महामेट्रोचे काम सुरू आहे. त्यासाठी सुमारे 1800 मजूर काम करतात. हे कामगार बावधन मधील कोकाटे वस्ती येथे राहतात. त्यांची प्रवासाची योग्य सुविधा असणे गरजेचे आहे. परंतु, केवळ दोन मालवाहू गाड्या मध्ये जेवढे कोंबून बसतील, तेवढ्या लोकांना प्रवास करता येतो. उर्वरित लोक चालत किंवा मिळेल त्या वाहनाने वस्ती गाठतात.

अपुरी वाहनसंख्या असल्याने ट्रक आला की त्यामध्ये घुसण्यावरून ओढाओढीस सुरूवात होते. बरेचदा किरकोळ भांडणेही होतात. सकाळी लवकर कामावर यायचे आणि संध्याकाळी उशिरा घरी जायचे. रात्री उशिरा घरी पोहचल्यावर स्वयंपाक करायचा आणि जेवून झोपी जायचे, हा येथील मजूरांचा दिनक्रम झाला आहे.

उत्तर प्रदेश, बिहार अशा लांबच्या प्रदेशातून आलेल्या या कामगारांना पाचशे रुपये रोज दिला जातो. कामगार कायद्यानुसार दोन किमीपेक्षा जास्त अंतरावर कामाचे ठिकाण असेल तर त्यांना नेण्या-आणण्याची व्यवस्था संबंधित ठेकेदाराने करायची आहे. परंतु, पैशाच्या लोभापायी ठेकेदार कमी वाहनांची सोय करतात. पोटासाठी दूरवर आलेला मजूर नाईलाजस्तव आहे ती परिस्थिती स्विकारतो. त्यामुळे त्याचे जीणे एखाद्या जनावरा सारखे बनते. या कामगारांची वाहतूक व्यवस्था व्यवस्थित करावी, अशी मागणी तारका फाउंडेशनचे आशिष कांटे यांनी केली आहे.

कांटे म्हणाले की, 'कंत्राटी कामगार कायद्यानुसार या कामगारांना सर्व सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. रात्री वस्तीवर जाणा-या कामगारांसाठी पुरेशी वाहन व्यवस्था केली जावी. म्हणजे जनावरे कोंबल्यासारखे कामगारांना ट्रकमध्ये कोंबून घेण्याची वेळ येणार नाही.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com