

Pune Metro Expansion Approved
Sakal
पुणे : पुणे मेट्रो रेल्वेच्या जाळ्यात आणखी ३२ किलोमीटरची भर घालणाऱ्या खराडी ते खडकवासला आणि नळ स्टॉप ते माणिकबाग अशा दोन मेट्रो रेल्वे मार्गांच्या नऊ हजार ८५८ कोटी रुपयांच्या विस्ताराच्या प्रस्तावाला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. त्याचबरोबर पश्चिम भारताला दक्षिण भारताशी जोडण्यात महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या बदलापूर-कर्जतदरम्यानच्या एक हजार ३२४ कोटींच्या प्रत्येकी ३२ किलोमीटर लांबीच्या तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गाच्या प्रस्तावालाही केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.