Pune Metro Pink Line Parking : मेट्रो सुरू झाली, पण गाडी पार्क कुठे करायची? हिंजवडी-शिवाजीनगर लाईन-३ वरील 'पार्क अँड राइड'चे वास्तव; पाहा कोणत्या स्थानकांवर आहे पार्किंग!

PMRDA Metro Line 3 station Parking Facilities : २३ पैकी अवघ्या काही स्थानकांवरच जागा; बाणेर, बालेवाडीत पालिका देणार भूखंड, गणेशखिंड रस्त्यावरील प्रवाशांची मात्र होणार मोठी कोंडी?
Major dilemma for commuters due to insufficient parking space at metro stations.

Major dilemma for commuters due to insufficient parking space at metro stations.

Sakal

Updated on: 

पुणेकरांची आणि विशेषतः हिंजवडी आयटी पार्ककडे जाणाऱ्या लाखो नोकरदारांची स्वप्नपूर्ती करणारी शिवाजीनगर ते मान-हिंजवडी मेट्रो लाईन-३ (पिंक लाईन / पुणेरी मेट्रो) अखेर प्रत्यक्ष प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे. दररोज तब्बल अडीच लाख प्रवासी वाहून नेण्याची क्षमता असलेल्या या २३.२ किलोमीटरच्या मार्गामुळे रस्त्यावरील वाहतूक कोंडी फुटणार असा दावा केला जात असला, तरी मेट्रो स्थानकावर पोहोचल्यानंतर "स्वतःची गाडी पार्क कुठे करायची?" (Park and Ride), हा सर्वात कळीचा आणि गंभीर प्रश्न आता प्रवाशांसमोर उभा ठाकला आहे.

संपूर्ण मार्गावरील २३ पैकी अवघ्या हाताच्या बोटांवर मोजण्याइतपत स्थानकांवरच हक्काची पार्किंग जागा उपलब्ध असल्याने, प्रवाशांना 'पार्क अँड राइड'चा लाभ मिळणार की गाड्या थेट टोईंगच्या विळख्यात अडकणार, याचा घेतलेला हा सखोल आढावा.

Loading content, please wait...