

Filling the 50% Revenue Gap
Sakal
पुणे : मेट्रोच्या एलिव्हेटेड कॉरिडॉरवर फायबर ऑप्टिक्सचे नेटवर्क खासगी टेलिकॉमला भाड्याने देणे, मोबाईल टॉवर उभारणीसाठी स्थानक आणि डेपोच्या इमारतींवर जागा भाड्याने देणे आदी उपाययोजना करून महामेट्रो आगामी काळात उत्पन्न वाढीसाठी (नॉन फेअर बॉक्स रेव्हेन्यू) प्रयत्न करणार आहे. त्यासाठी विविध योजना महामेट्रोने तयार केल्या असून, त्यात खासगी उद्योग, व्यावसायिकांना सामावून घेतले जाणार आहे.