#PuneMetro सातारा रस्त्यावर मेट्रो नाही ?

#PuneMetro सातारा रस्त्यावर मेट्रो नाही ?
Updated on

पुणे - सातारा रस्त्यावरून स्वारगेटपासून थेट कात्रज चौकापर्यंतच्या मेट्रो मार्गाचा नियोजित प्रवास अवघड झाला आहे. उड्डाण पूल, बीआरटी आणि अरुंद रस्त्यांमुळे पद्मावती, धनकवडी, बालाजीनगरऐवजी मुकुंदनगर, मार्केट यार्ड, बिबवेवाडीमार्गे कात्रजला मेट्रो धावण्याची शक्‍यता आहे.

स्वारगेट- कात्रजदरम्यान साडेचार-पाच किलोमीटर मेट्रो मार्गासाठी प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम महामेट्रो करीत आहेत. त्याबाबत सर्वेक्षण सुरू आहे. हा अहवाल एक-दीड महिन्यात पालिकेला सादर होणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सातारा रस्त्यावरून मेट्रोची शक्‍यता तूर्त तरी दिसत नाही. त्यामुळेच पर्यायी मार्गाची आखणी सुरू आहे. 

सातारा रस्त्यावरून मेट्रो अवघड का? 
स्वारगेट चौकापर्यंत भुयारी मेट्रोमार्ग आहे. तेथून मेट्रो बाहेर पडण्यासाठी पाऊण ते एक किलोमीटरचे अंतर लागेल. याच रस्त्यावर प्रेमनगर चौकात भुयारी मार्ग आहे. तसेच पद्मावतीपासून पुढे धनकवडीचा उड्डाण पूल सुरू होतो. भुयारी मार्ग आणि उड्डाण पुलामुळे तेथे मेट्रोचे काम करता येणार नाही. उड्डाण पुलाच्या बाजूला दुतर्फा रुंदीकरण अपेक्षित होते. परंतु ते झालेले नाही. त्यामुळे बिबवेवाडी कॉर्नर ते बालाजीनगरदरम्यान मेट्रो शक्‍य नाही. सातारा रस्त्यावर बीआरटीचे काम पूर्ण होत आले आहे. त्यामुळे कात्रज- स्वारगेटदरम्यान बीआरटीचा वापर करून प्रवासी इच्छितस्थळी पोचतील. 

स्वारगेट- कात्रज मार्गासाठी प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. बीआरटी, उड्डाण पूल आणि रस्त्यांच्या रुंदीचा विचार करून काही पर्यायांवर विचार सुरू आहे. त्याबाबत सध्या वाहतुकीचा अभ्यास सुरू आहे. प्रवासी संख्या लक्षात घेऊन मार्गाची निश्‍चित आखणी केली जाईल. याबाबतचा अंतिम अहवाल एक-दीड महिन्यात महापालिकेला सादर करू.
- ब्रिजेश दीक्षित, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो

एलिव्हेटेड मेट्रोच शक्‍य 
 स्वारगेटच्या तुलनेत कात्रज ६०-७० मीटर उंचीवर आहे. त्यातच दोन पादचारी भुयारी मार्ग, दोन उड्डाण पुलांमुळे भुयारी मेट्रो अवघड आहे अन्‌ खर्चही प्रचंड येऊ शकतो. त्यामुळेच एलिव्हेटेड मेट्रो हाच पर्याय वाजवी आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 
 भुयारी मेट्रोसाठी प्रति किलोमीटर किमान ७५० कोटी रुपये खर्च येतो. तर, एलिव्हेटेडसाठी सुमारे २५० कोटी रुपये प्रति किलोमीटर खर्च आहे. 

मेट्रोसाठी मार्ग निश्‍चित करताना जास्तीत जास्त प्रवासी उपलब्ध होतील, याचा विचार करणे आवश्‍यक आहे. त्यासाठीच मुकुंदनगर, मार्केट यार्ड, बिबवेवाडीचे पर्याय सुचविले आहेत. हा मार्ग आगामी काळात हडपसर मेट्रोला जोडण्यासाठी नियोजन करणे गरजेचे आहे. तशा सूचना महामेट्रोला दिल्या आहेत. 
- माधुरी मिसाळ, आमदार

...असा असेल नियोजित मेट्रो मार्ग
 स्वारगेट, मुकुंदनगर, मार्केट यार्ड, गंगाधाम चौक, व्हीआयटी कॉलेज, गोकुळनगर, कात्रज (अंतर सुमारे ९ किलोमीटर) 
 अप्पर इंदिरानगरला महापालिकेच्या जागेत मेट्रोचा डेपो किंवा स्थानकासाठी जागा उपलब्ध होऊ शकते. 
 या भागातील लोकसंख्या सुमारे दोन लाख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

The Maharashtra Social Welfare Department says technical issues, if any, will be resolved and no eligible student will be denied the scholarship.
The protesters also expressed support for the ongoing Jantar Mantar agitation and condemned the alleged police action against students in Delhi.
The CBI is investigating the cases, and the government says it is committed to protecting students' interests and ensuring transparency in competitive examinations.
The Pune Fire Brigade reported 372 tree fall incidents across the city between July 1 and July 23.
Marathi News Esakal
www.esakal.com