

Pune Metro Phase-2 Expansion Approved
Sakal
पुणे : खडकवासला- स्वारगेट-हडपसर-खराडी मेट्रोमार्गांतर्गत हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर बस डेपो ते सासवड रोड या दोन विस्तारित मेट्रो प्रकल्पांच्या अंमलबजावणीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मंगळवारी मंजुरी देण्यात आली, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.