

Metro Car Shed Land Proposal Rejected by CWPRS
Sakal
खडकवासला : खडकवासला-स्वारगेट-हडपसर-खराडी या चौथ्या टप्प्यातील मेट्रो मार्गाच्या कारशेडसाठी खडकवासला येथील केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्राची (सीडब्ल्यूपीआरएस) २० हेक्टर जागा प्रस्तावित करण्यात आली आहे. मात्र, या भूसंपादनासाठी पाठविण्यात आलेल्या मागणीवर ‘संशोधन संस्थे’ने जागा उपलब्ध नसल्याचे स्पष्ट करून हा प्रस्ताव नाकारला आहे.