Pune Metro Record Ridership : आषाढी वारीत पुणे मेट्रोचा नवा विक्रम; एकाच दिवशी तब्बल ३.५२ लाख प्रवाशांनी केला प्रवास

Ashadhi Ekadashi Pune : मेट्रोमध्ये ‘विठ्ठल विठ्ठल’, ‘ज्ञानोबा तुकाराम’ जयघोष आणि अभंगांनी भक्तिमय वातावरण निर्माण झाले. वारकऱ्यांनी टाळ-मृदंग आणि भजनांसह मेट्रो प्रवास करून आधुनिकतेत भक्तीचा संगम दाखवला.
Devotional Atmosphere Inside Metro with “Vitthal Vitthal” Chants

Devotional Atmosphere Inside Metro with “Vitthal Vitthal” Chants

esakal

Updated on

Special Metro Services for Ashadhi Ekadashi Devotees : संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पवित्र पालखी सोहळ्यांच्या आगमनाने पुणे शहर भाविकांच्या गर्दीने फुलले आहे. हजारो वारकऱ्यांनी पारंपरिक पायी प्रवासाबरोबरच आधुनिक वाहतूक व्यवस्थेला प्राधान्य दिले. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पुणे मेट्रोने सुरु केलेल्या विशेष सेवांमुळे ९ जुलै २०२६ रोजी अवघ्या एका दिवसात ३,५२,६०६ प्रवाशांची नोंद करत नवा विक्रम प्रस्थापित केला. हा आकडा पूर्वीच्या सर्वाधिक प्रवासी संख्येच्या तुलनेत लक्षणीय वाढ दर्शवतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com