Pune Metro : पुणेकरांची मेट्रोकडे पाठ! पाच लाख प्रवासी घटले, उत्पन्नही झाले कमी
Pune Metro : पुणे मेट्रो प्रवाशांची संख्या मागील तीन महिन्यांपासून घटत चालली आहे. दैनंदिन प्रवासी संख्या दोन लाखाच्या पुढे पोहोचणे अपेक्षित असताना अद्यापही सरासरी प्रवासी संख्या एक लाख 60 हजारांच्या दरम्यानच आहे.
पुणे मेट्रो प्रवाशांची संख्या मागील तीन महिन्यांपासून घटत चालली आहे. मार्च महिन्यात प्रवाशांच्या संख्येत मोठी घसरण झाली आहे. याचा परिणाम तिकीट उत्पन्नावरही झाला आहे. जानेवारीच्या तुलनेत मार्च महिन्यात सर्वात जास्त पाच लाख प्रवाशी घटले आहेत.