

The inauguration date will now be decided by the Central and Maharashtra governments.
Sakal
पुणे : हिंजवडी- शिवाजीनगर मेट्रो मार्गावरील माण ते आर. के. लक्ष्मण म्युझियम (बालेवाडी) दरम्यान प्रवासी वाहतुकीसाठी आवश्यक असलेली परवानगी कमिश्नर ऑफ मेट्रो रेल्वे सेफ्टी (सीएमआरएस) कार्यालयाने दिल्याची माहिती पुणे महानगर क्षेत्र प्राधिकरणाने (पीएमआरडीए) शुक्रवारी दिली. त्यामुळे या मार्गावरील प्रवासी वाहतुकीचे उदघाटन केंद्र - राज्य सरकार केव्हा करणार, याकडे आता प्रवाशांचे लक्ष लागले आहे.