esakal | Pune Metro : पुणे मेट्रो धावणार विनाचालक
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Metro

Pune Metro : पुणे मेट्रो धावणार विनाचालक

sakal_logo
By
दिलीप कुऱ्हाडे

येरवडा : पुणे मेट्रो ही स्वयंचलित असून ती विना चालक धावणार आहे. मात्र पुणेकरांना त्याची सवय झाल्यानंतर पण हा काय प्रकार आहे असे तुम्हाला वाटेल. सुरवातीलाच मेट्रो विना चालक धावली तर पुणेकर घाबरून कोणी त्यात बसणार नाही. त्यामुळे प्रवाशांना सवय झाल्यानंतर मेट्रो विना चालक धावणार असल्याची माहिती अधिकृत सुत्रांनी दिली.

हेही वाचा: Manohar Mama Bhosale | बारामती न्यायालयाकडून मनोहर भोसलेला जामिन मंजूर

आता सर्वांनाच ऑटोमोड हा शब्द परिचयाचा झाला आहे. पुणे मेट्रो ऑटोमोड असणार आहे. वनाझ ते रामवाडी व पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट दरम्यान मेट्रो विना चालक धावणार आहे. तर शिवाजीनगर ते हिंजवडी हा मार्ग लवकरच सुरू होत आहे. या तिन्ही मार्गांचे नियंत्रण मेट्रोचे टर्मिनल असलेल्या शिवाजीनगर येथील धान्य गोडाऊन स्थानकावर असणार आहे. मेट्रो ट्रेनच्या आतील व मेट्रोच्या स्थानकातील शेकडो सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे नियंत्रण कक्ष शिवाजीनगरला असणार आहे. त्यामुळे येथुन मेट्रोवर नियंत्रण केले जाणार आहे. त्यामुळे चालकाची आवश्‍यकता नसणार असल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे.

पुणे मेट्रो मार्ग संपूर्ण तयार झाल्यानंतर मेट्रो अवघ्या साठ सेंकदाला प्रवाशांच्या सेवेला उपलब्ध होणार आहे. लक्ष्मी रस्त्यावरील खरेदी, बालगंधर्वला नाटक,आयनॉक्स किंवा ई स्क्वेअरला सिनेमा असो कि दगडूशेट गणपतीचे दर्शन मेट्रोच्या मार्गावर आहेत. त्यामुळे पुणेकरांना मोटार किंवा दुचाकी लावण्यासाठी वाहनतळ शोधण्याची गरज लागणार नाही. वातानुकुलित मेट्रो मधुन प्रवास करून खरेदीचा आणि नाटक सिनेमाचा आस्वाद घेता येणार आहे.

हेही वाचा: चित्रा वाघ यांचा भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश

भारतीय रेल्वेचा प्रवास

ल्युमियर बंधुनी २८ डिसेंबर १८९५ मध्ये ‘ द अरायव्हल ऑफ द ट्रेन’ हा चित्रपट फ्रान्सची राजधानी पॅरिसच्या अेका सभागृहात दाखविली होती. चित्रपटात फ्लॅटफॉर्मवर रेल्वे येत असल्याचे दाखविण्यात येताच प्रेक्षकांनी सभागृहातून धूम ठोकली होती. कारण प्रेक्षकांनी यापूर्वी कधीच रेल्वे पाहिली नव्हती. त्यामुळे त्यांची तारांबळ उडाली.

मात्र ल्युमियर बंधुनी हाच चित्रपट पुन्हा ७ जुलै १८९६ मध्ये मुंबई येथील वॅटसन हॉटेल मध्ये दाखविली पण गंमत म्हणजे प्रेक्षकांनी काहीच हालचाल केली नव्हती. कारण मुंबईकरांनी चित्रपट पाहण्यापूर्वी म्हणजे ४३ वर्षांपूर्वी १६ अेप्रिल १८५३ मध्ये बोरीबंदर ते ठाणे दरम्यान रेल्वे धावलेली पाहिली होती. हा संदर्भ देण्याचे कारण कि ब्रिटीशांनी जरी जगातील काही देशांच्या पहिले रेल्वे भारतात सुरू केली असली तरी येथे मेट्रो धावण्यासाठी पन्नास ते साठ वर्ष वाट पाहावी लागल्याचे वास्तव आहे.

loading image
go to top