esakal | Pune : जिल्हास्तरीय प्रौढ टेबल-टेनिस स्पर्धेत म्हसकर आणि मरकळे प्रथम
sakal

बोलून बातमी शोधा

 जिल्हास्तरीय प्रौढ टेबल-टेनिस स्पर्धा

जिल्हास्तरीय प्रौढ टेबल-टेनिस स्पर्धेत म्हसकर आणि मरकळे प्रथम

sakal_logo
By
कृष्णकांत कोबल

हडपसर : पुणे जिल्हा शिक्षण मंडळ संचलित अण्णासाहेब मगर महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय प्रौढ टेबल-टेनिस स्पर्धा उत्साहात पार पडली. मगर महाविद्यालय व मास्टर्स गेम्स असोसिएशनच्या वतीने घेण्यात आलेल्या या स्पर्धेत सत्तर वर्षावरील गटात अजय म्हसकर तर पासष्ट वर्षावरील गटात प्रमोद मरकळे यांनी प्रथम क्रमांक मिळविला.

दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंडित शेळके यांच्या हस्ते उद्घाटन झाले तर, दौंडचे गटविकास अधिकारी अजिंक्य येळे यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस देवून स्पर्धेचा समारोप झाला. उपप्राचार्य डॉ. प्रशांत मुळे, काकासाहेब थोरात, अनिल जगताप, मास्टर्स गेम्स असोसिएशनचे अध्यक्ष सहिंद्र भावले, सचिव महेंद्र बाजारे, कार्याध्यक्ष धनंजय मदने, खजिनदार रेखा आबनावे, जिमखाना कमिटी सदस्य प्रा. सचिनकुमार शहा, प्रा. भागवत भराटे, प्रा. एम.जे. खैरे, प्रा. भाऊसाहेब भोसले आदी यावेळी उपस्थित होते.

स्पर्धेत तीस ते चौतीस वयोगटात सतीश मुळूक, प्रितम ओव्हाळ, उबैर अरिफ, चाळीस ते चौव्वेचाळीस वयोगटात अस्लम मोकाशी, पुलकेश गुणईचा, रवींद्र मुरूमकर, पंचेचाळीस ते एकोणपन्नास वयोगटात राजीव कुल्लरवार, अंकुश सपकाळ, प्रदीप पारखी, पन्नास ते चौपन वयोगटात प्रकाश सोलापुरे, संजय भट, रमाकांत जोशी, पंचावन्न ते एकोणसाठ वयोगटात विलास पाखरे, संजीव पवार, सतीश नारखेडे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला.

हेही वाचा: महाविद्यालये सुरू होण्याची तारीख ठरली, असे असतील नियम

पस्तीस ते एकोणचाळीस वयोगटात एजाज सय्यद, अमोल कचरे यांनी तर साठ ते चौसष्ट वयोगटात रोहिदास गरुड, हरीश साळवी यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावला. तर पासष्ट ते एकोणसत्तर व सत्तरच्या पुढील गटात

प्रमोद मरकळे व अजय म्हसकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. महिलांमध्ये पंचेचाळीस ते एकोणपन्नास वयोगटात मनिषा जगदाळे तर पन्नास ते चौपन वयोगटात डॉ. शुभांगी औटी यांनी प्रथम क्रमांक पटकावला. सर्व सहभागींना उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्रे देण्यात आली. प्रास्ताविक प्रा. संजीव पवार यांनी तर आभार प्रा. प्रितम ओव्हाळ यांनी मानले.

loading image
go to top