पुणेकरांनो, उत्तरेकडील वाऱ्यांमुळे पुण्यातील थंडी पळाली 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 23 November 2020

पुण्यात किमान तापमानाचा पारा 5.2 अंश सेल्सिअसने वाढला. उत्तरेतून महाराष्ट्राच्या दिशेने वाहत होते. त्यामुळे किमान तापमान 9 अंश सेल्सिअसपर्यंत कमी झाले होते.

पुणे - उत्तरेतील थंड वाऱ्यांचा प्रभाव कमी झाल्याने पुण्यातील थंडी पळाली आहे. रविवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत किमान तापमानाची 18.6 अंश सेल्सिअस इतकी नोंद झाली आहे. 

पुण्यात किमान तापमानाचा पारा 5.2 अंश सेल्सिअसने वाढला. उत्तरेतून महाराष्ट्राच्या दिशेने वाहत होते. त्यामुळे किमान तापमान 9 अंश सेल्सिअसपर्यंत कमी झाले होते; मात्र आता पुण्यासह महाराष्ट्रातील प्रमुख शहरांतील किमान तापमानात वाढ झाली आहे, अशी माहिती भारतीय हवामान खात्यातील शास्त्रज्ञ डॉ. अनुपन काश्‍यपी यांनी दिली. 

अनावश्यक वादात चंद्रकांत पाटील यांना ओढणं चुकीचं!​

ते म्हणाले, "पुण्यात वाऱ्यांची दिशा बदलली आहे. उत्तरेतून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रभावामुळे महाराष्ट्रातील किमान तापमानाचा पारा घसरतो; मात्र सध्या पूर्वेकडून वारे वाहत आहेत. त्यामुळे पुढील काही दिवस किमान तापमानाचा पारा सरासरीपेक्षा जास्त नोंदवला जाईल. पुढील दोन ते तीन दिवसांत आकाश निरभ्र राहील. तसेच हवेतील आद्रतेचे प्रमाण कमी होईल. त्याचा परिणाम म्हणून किमान तापमानाचा पारा काही अंशी कमी होण्याची शक्‍यता आहे.' 

'मला चंपा म्हणता, ते चालतं का? चंद्रकांत पाटलांचा राष्ट्रवादीला सवाल​

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत त्याची तीव्रता वाढून त्याचे रूपांतर चक्रीवादळात होण्याची शक्‍यता आहे. तमिळनाडूच्या किनारपट्टीवर हे चक्रीवादळ येत्या बुधवारपर्यंत (ता. 25) धडकण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्याचवेळी अरबी समुद्रातील गती चक्रीवादळ सोमानियाच्या दिशेने पुढे सरकत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune minimum temperature was recorded at 18.6 degrees Celsius