

Pune Crime Case involving minor girl assault; Airport Police register FIR against accused Aditya Bele.
पुणे : अल्पवयीन मुलीला धमकावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आदित्य जनार्दन बेले (वय २०, रा. कलवड वस्ती, धानोरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. जानेवारी ते जून या कालावधीत हा प्रकार घडला.